lg free tv channels
LG Free TV Channels: प्रसिद्ध टेक कंपनी LG india चे Smart TV भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या ब्रँडचे स्मार्ट टीव्ही जवळपास भारतात प्रत्येक घरात वापरले गेले आहेत किंवा वापरीत आहेत. आता ब्रँडने त्यांच्या मोफत जाहिरात-समर्थित टीव्ही (फास्ट) सेवेचा विस्तार करण्याची घोषणा देखील केली आहे. LG चॅनेल्स, जी 100 हून अधिक चॅनेल्सची सुविधा प्रदान करते. या सेवेचा उद्देश LG स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांना कोणत्याही सबस्क्रिप्शन किंवा पेमेंटशिवाय मोफत कंटेंट प्रदान करणे होय. यासह LG TV वापरकर्त्याना 100 हुन अधिक मोफत टीव्ही चॅनेल्स मिळतील.
सविस्तर बोलायचे झाल्यास, LG चॅनेल्स हे एक मोफत जाहिरात-समर्थित TV प्लॅटफॉर्म आहे. येथे वापरकर्त्यांना एंटरटेनमेंट, म्युझिक, न्यूज, किड्स आणि लाइफस्टाइल अशा अनेक कॅटेगरीजमध्ये कंटेंट दिला जातो. खास गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही सेट-टॉप बॉक्सची किंवा अतिरिक्त सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही.
Also Read: Amazon सेलमध्ये Smart TV वर मिळतेय प्रचंड सूट, 10,000 पेक्षा कमी किमतीत मिळतात Best ऑप्शन्स
LG Channels हे LG Smart TV साठी एका समर्पित ऍपद्वारे उपलब्ध आहेत. यामध्ये, वापरकर्त्यांना मोफत सबस्क्रिप्शन-फ्री आणि निरनिराळे कंटेंट पाहायला मिळेल. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे एमडी हाँग जू जिओन म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांचा मनोरंजन अनुभव वाढवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. एलजी चॅनेल्स आता सर्व वयोगटातील आणि आवडीनिवडी असलेल्या वापरकर्त्यांसाठी 100 हून अधिक मोफत चॅनेल ऑफर करत आहे. त्यामुळे आम्ही ही सेवा अधिक वैयक्तिकृत आणि विस्तारित करण्याच्या दिशेने काम करत आहोत.”
पुढे LG चॅनेल्समध्ये हिंदी, इंग्रजी, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, तेलगू, मराठी, गुजराती आणि बंगाली अशा अनेक भाषांमध्ये कंटेंट मिळणार आहे. जिथे वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क न देता जाहिरात-समर्थित मोफत कंटेंट मिळेल, अशा फास्ट सेवांची लोकप्रियता वाढत चालली आहे. LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे म्हणणे आहे की, येत्या काळात LG चॅनेल्समध्ये आणखी चॅनेल्स जोडले जातील, ज्यामुळे वापरकर्त्यांना आणखी पर्याय मिळू शकतात.