प्रसिद्ध टेक निर्माता Haier चे Smart TV भारतात लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीने Haier M80F Series Mini LED 4K स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केले आहेत. या सिरीजअंतर्गत, कंपनीने भारतात अनेक स्क्रीन-साईजचे टीव्ही सादर केले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला 55 इंच, 65 इंच, 75 इंच आणि 85 इंच लांबीचे TV मिळतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये मिनी LED टेक्नॉलॉजी आहे. तसेच, यात HDR10 आणि डॉल्बी व्हिजन IQ तंत्रज्ञानाचा देखील सपोर्ट आहे. जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात किंमत आणि संपूर्ण तपशील-
Also Read: बजेटमध्ये मोठ्या स्क्रीनसह Thomson QLED TV भारतात लाँच, किंमत 6,799 पासून सुरु
Haier M80F Series Mini LED 4K स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत 57,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही ही टीव्ही सिरीज निवडक रिटेल स्टोअर्समधून खरेदी करण्यास सक्षम असणार आहात.
वर सांगितल्याप्रमाणे, Haier M80F Series Mini LED 4K स्मार्ट टीव्ही 55 इंच, 65 इंच, 75 इंच आणि 85 इंच स्क्रीन आकारात सादर करण्यात आला आहे. स्क्रीनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे, ही स्क्रीन एका सुपर ब्राइट डिस्प्लेसह येईल. त्याबरोबरच, यामध्ये तुम्हाला HDR10, डॉल्बी व्हिजन IQ, मिनी LED आणि MEMC तंत्रज्ञानाचा सपोर्ट मिळतो. यात तुमच्या डोळ्यांचे आरोग्याची देखील काळजी घेण्यात आली आहे. डोळ्यांच्या रक्षणासाठी, हा टीव्ही TÜV लो ब्लू लाईट प्रमाणित आहे.
या टीव्हीमध्ये DLG तंत्रज्ञान, ऑटो लो लेटन्सी मोड म्हणजेच ALLM आणि व्हेरिएबल रिफ्रेश रेट म्हणजेच VRR सपोर्ट देखील आहे. या टेक्नॉलॉजीसह तुम्हाला टीव्हीवर एक स्मूथ गेमिंग अनुभव मिळेल. या टीव्ही रिमोटमध्ये USB टाइप-C आणि सोलर चार्जिंग देखील उपलब्ध आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये गुगल टीव्ही, HaiSmart App compatibility आणि HaiCast Screen Mirroring इ. सुविधा उपलब्ध आहेत. टीव्हीमध्ये KEF कंपनीची ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे. यासह डॉल्बी ATMOS सपोर्ट आहे.