LED SMART TV UNDER 7000 RS
Budget Smart TV: जर तुम्ही देखील कमी किमतीत उत्तम स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचे विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, TV खरेदी करणे आता पूर्वीसारखे महाग राहिलेले नाही. सध्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Smart TV स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. अनेक प्रसिद्ध ब्रँडचे स्मार्ट टीव्ही 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. हे स्मार्ट टीव्ही नवीनतम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमने सुसज्ज आहेत.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर वापरकर्त्यांना 32-इंच, 43-इंच, 50-इंच, 55-इंच आणि 65-इंच स्मार्ट टीव्हीवर ऑफर मिळेल. मात्र, या रिपोर्टमध्ये तुम्हाला 7000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, वापरकर्त्यांना या टीव्हीमध्ये अनेक प्री-इंस्टॉल केलेले OTT ऍप्स मिळतील. पाहुयात स्वस्त किमतीत मिळणारे जबरदस्त स्मार्ट टीव्हीची यादी-
Also Read: निम्म्याहून कमी किमतीत मिळतोय Acer चा मोठा Smart TV, फक्त 20,000 रुपयांअंतर्गत आहे किंमत
Thomson कंपनीचा या टीव्हीची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. Flipkart हा स्मार्ट टीव्ही केवळ 6,399 रुपयांना उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने 24 इंच लांबीच्या HD रेडी LED स्क्रीनने सुसज्ज असलेल्या या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला 63% ची सूट मिळेल. या स्मार्ट टीव्हीमध्ये 20W चा पॉवरफूल स्पीकर आहेत. यामध्ये, वापरकर्ते लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऍप्स वापरण्यास सक्षम असतील. यावर तुम्हाला बँक ऑफर्स आणि इतर ऑफर्स देखील मिळणार आहेत.
Vistek च्या स्मार्ट टीव्हीची किंमत 10,999 रुपये इतकी आहे. Flipkart हा फोन डिस्काउंटनंतर 6,400 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. त्यात HD रेडी LED स्क्रीन देखील देण्यात आली आहे. शिवाय, त्यात अनेक प्री-इंस्टॉल केलेले ऍप्स आहेत. तुम्ही ब्रँड आणि मॉडेलनुसार नेटफ्लिक्स, यूट्यूब किंवा डिझनी+हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मवरून कंटेंट स्ट्रीम करू शकता.
Blaupunkt स्मार्ट टीव्ही Flipkart ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी केल्यास 6,499 रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीच्या खरेदीवर 40% सूट दिली जात आहे. या TV ची किंमत 10,999 रुपये आहे. या टीव्हीमध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम देखील आहे. यात 24 इंच लांबीचा HD रेडी LED स्क्रीन आहे. TV च्या हाय कॉलिटी डिस्प्लेसह तुम्हाला भारी अनुभव मिळेल. टीव्हीची स्लिम बेझल डिझाइन देखील सुंदरतेचा स्पर्श देते. शिवाय, या टीव्हीमध्ये एक इमर्सिव्ह साउंड आउटपुट आहे. ज्यामुळे तुम्ही चित्रपटातील साउंडट्रॅक ऐकू शकता. वरील सर्व स्मार्ट टीव्हीबद्दल सविस्तर माहितीसाठी इ-कॉमर्स Flipkart ला व्हिजिट करा.