निम्म्याहून कमी किमतीत मिळतोय Acer चा मोठा Smart TV, फक्त 20,000 रुपयांअंतर्गत आहे किंमत

Updated on 04-Feb-2025
HIGHLIGHTS

तुम्हाला प्रसिद्ध ब्रँड Acer चा मोठा स्मार्ट टीव्ही कमी किमतीत खरेदी करता येईल.

Acer चा 43 इंच लांबीचा LED स्मार्ट टीव्ही निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध

तुम्हाला निवडक क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल.

तुम्हाला देखील तुमच्या घरासाठी नवीन आणि मोठा Smart TV खरेदी करायचा असेल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला प्रसिद्ध ब्रँड Acer चा मोठा स्मार्ट टीव्ही कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. होय, या रिपोर्टमध्ये आज आम्ही तुम्हाला Acer च्या एका उत्तम स्मार्ट टीव्ही डीलबद्दल माहिती देणार आहोत. हा स्मार्ट टीव्ही सध्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. 43 इंच लांबीचा ही स्मार्ट टीव्ही डील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Acer TV वरील सर्वोत्तम डील-

Also Read: Samsung TV Deals: 65 इंचपर्यंत स्मार्ट टीव्हीच्या किमतीत मोठी घसरण, अजिबात चुकवू नका ‘या’ डील्स

Acer (43 inches) I Pro Series 4K Ultra HD LED Smart Google TV वरील ऑफर्स

प्रसिद्ध टेक जायंट Acer (43 inches) I Pro Series 4K Ultra HD LED Smart Google TV ची किंमत 43,999 रुपये इतकी आहे. मात्र, Amazon वर ही TV 57% सवलतीसह केवळ 18,999 रुपयांच्या किमतीत सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला निवडक क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. एवढेच नाही तर, जर तुमच्याकडे जुना टीव्ही असेल जो तुम्हाला एक्सचेंज केल्यास 2,830 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Acer (43 inches) I Pro Series 4K Ultra HD LED Smart Google TV चे स्पेसिफिकेशन्स

Acer (43 inches) I Pro Series 4K Ultra HD LED Smart Google TV वरील स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये अर्थातच 43-इंच लांबीचा 4K HDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझॉल्युशन 3840x 2160 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. या TV चे साउंड आउटपुट 30W आहे, तर इतर ध्वनी साउंड फीचर्समध्ये डॉल्बी ऑडिओसह स्पीकर्स आणि 5 साउंड मोड समाविष्ट आहेत. या टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Zee5, Eros Now, JioCinema, SonyLiv, Youtube, Hungama, Hotstar इ. OTT ऍप्स इनबिल्ट आहेत.

याशिवाय, Android 14 सोबत, यात Google TV, गुगल कास्ट, मीटिंग मोड, 2.0GB रॅम, 16GB स्टोरेज, गुगल असिस्टंट, क्वाड कोअर प्रोसेसर आणि स्क्रीन सेव्हर देखील आहेत. कंपनी खरेदीच्या दिवसापासून या डिव्हाइससोबत एक वर्षाची वॉरंटी देखील देते. त्याबरोबरच, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-बँड WiFi, ब्लूटूथ 5.2, HDMI पोर्ट 2.1x 3, USB 2.0x 1 आणि बरेच काही समाविष्ट आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :