Best Smart TV Under 18000: अप्रतिम फीचर्ससह येतात 43 इंचपर्यंतचे टीव्ही, मुव्ही पाहण्यात येईल आणखी मज्जा!

Updated on 17-Feb-2025
HIGHLIGHTS

प्रीमियमसोबतच मध्यम श्रेणीच्या Smart TV लाही भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

18,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Amazon बेस्ट स्मार्ट टीव्ही उपलब्ध

TCL, Acer इ. प्रसिद्ध ब्रँडचे स्मार्ट टीव्ही यादीत समाविष्ट

Best Smart TV Under 18000: आपणा सर्वांना माहितीच आहे की, प्रीमियमसोबतच मध्यम श्रेणीच्या स्मार्ट टीव्हीलाही भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण, सर्व सामान्य भारतीय ग्राहकांची परवडणाऱ्या किमतीत अप्रतिम उपकरणे असावीत, अशीच अपेक्षा असते. त्यामुळे, तुम्ही देखील जुना टीव्ही बदलून नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या 40 ते 43 इंच लांबीच्या टीव्हीबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 18,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हे स्मार्ट टीव्ही चांगल्या कनेक्टिव्हिटीपासून ते OTT ऍप्सपर्यंत सर्व प्रकारचे सपोर्ट प्रदान करतील. आम्ही तुमच्यासाठी 18,000 रुपयांअंतर्गत बेस्ट स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत. पहा यादी-

Also Read: Budget TV: प्रसिद्ध कंपनीच्या जबरदस्त टीव्हीवर भारी Discount, 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करण्याची संधी

TCL Bezel-Less Full HD Smart Android LED TV

TCL Bezel-Less Full HD Smart Android LED TV हा TCL स्मार्ट टीव्ही 40 इंच लांबीच्या फुल HD डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या टीव्हीची किंमत 15,990 रुपये आहे. Amazon वर ऑफर्ससह हा टीव्ही याहून कमी किमतीत मिळू शकतो. या डिस्प्लेच्या रिझॉल्युशन 1920x 1080 इतके आहे. साउंडसाठी, यात 19W चा साउंड आउटपुट आणि डॉल्बी ऑडिओ आहे. तसेच, यात बिल्ट-इन वायफाय, स्क्रीन शेअरिंग, 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. यामध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ सारखे प्रसिद्ध OTT ऍप्स देखील उपलब्ध आहेत.

Acer HD Smart LED Google TV

Acer चा Acer HD Smart LED Google TV हा स्मार्ट टीव्ही देखील 40 इंच लांबीच्या HD डिस्प्लेसह येतो. या स्मार्ट टीव्हीची किंमत 16,499 रुपये इतकी आहे. इ-कॉमर्स साईटवर या टीव्हीच्या खरेदीवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे. हा टीव्ही 800 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल. या टीव्हीचे रिझोल्यूशन 1920x 1080 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, हेडफोन जॅक आणि HDMI पोर्ट देण्यात आले आहेत. यात व्हिडिओ कॉलिंग फंक्शनसह लोकप्रिय OTT ऍप्स आहेत.

Hisense Series Full HD Smart Google LED TV

Hisense Series Full HD Smart Google LED TV या हायसेन्स टीव्हीमध्ये 43 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो. Amazon वर या टीव्हीची किंमत 19,999 रुपये आहे. इ-कॉमर्स साईट टीव्हीवर अनेक ऑफर्स देतात. यावर 1500 रुपयांची सूट आणि 970 रुपयांचा EMI दिला जात आहे. आम्ही तुम्हाला संतगो की, HDR 10 सोबत यात Movie, ECO, Gentle, Vivid, Sport आणि Game असे अनेक मोड्स देण्यात आले आहेत. तर, मनोरंजनासाठी स्मार्ट टीव्हीमध्ये YouTube, प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स इत्यादी OTT ऍप्स देखील इनबिल्ट आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :