Samsung चे स्मार्ट टीव्ही भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.
Samsung ने गुढी पाडवा, उगादी आणि होळीच्या सणानिमित्त प्रीमियम AI मोठ्या-स्क्रीन टीव्हीवर विशेष उत्सवी ऑफर जाहीर केले.
जाणून घेऊयात ऑफर्स आणि Samsung चे बेस्ट Smart TV मॉडेल्स
samsung ai tvs
Samsung AI TVs: साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक दिग्गज Samsung चे स्मार्ट टीव्ही भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. दरम्यान, भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या Samsung ने गुढी पाडवा, उगादी आणि होळीच्या खास प्रसंगी त्यांच्या प्रीमियम AI मोठ्या-स्क्रीन टीव्हीवर विशेष उत्सवी ऑफर जाहीर केल्या आहेत. ही धमाकेदार सेल 5 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत चालेल. ज्यामध्ये ग्राहकांना Neo QLED 8K, Neo QLED 4K, OLED आणि Crystal 4K UHD टीव्हीवर सर्वोत्तम ऑफर्स मिळत आहेत. पहा डील्स-
या फेस्टिव्ह सेलमध्ये Samsung आपल्या ग्राहकांना घरातील मनोरंजन अपग्रेड करण्याची सुवर्ण संधी देत आहे.
या सेलमध्ये ग्राहकांना 2,04,990 पर्यंत किमतीचा टीव्ही मोफत किंवा 90,990 पर्यंत किमतीचा साउंडबार मोफत मिळू शकेल.
यासह कंपनी 20% पर्यंत कॅशबॅक, झिरो डाउन पेमेंट आणि 2,990 रुपयांपासून 30 महिन्यांपर्यंत इझी EMI देखील देत आहे.
एवढेच नाही तर Samsung साउंडबारवर 45% पर्यंत सूट दिली जात आहे, जी तुमच्या घरात एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव देईल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक या आकर्षक ऑफर्सचा लाभ Samsung.com, आघाडीच्या ऑनलाइन पोर्टल्स आणि भारतातील निवडक सॅमसंग रिटेल स्टोअर्सवर घेऊ शकतात. महत्त्वाचे लक्षात घ्या की, या ऑफर 55-इंच आणि त्यापेक्षा जास्त टीव्ही मॉडेल्सवर लागू असतील.
Samsung चे बेस्ट स्मार्ट TV मॉडेल्स
Samsung चा Neo QLED 8K टीव्ही NQ8 AI Gen2 प्रोसेसरद्वारे समर्थित असतात. या स्मार्ट TV मध्ये 256 AI न्यूरल नेटवर्क आहेत. हे नेटवर्क उत्कृष्ट पिक्चर आणि साउंड कॉलिटी प्रदान करतात. टीव्हीमधील उपलब्ध विशेष फीचर्ससह गेमिंग आणि लाईव्ह स्पोर्ट्सचा अनुभव देखील सहज आणि वेगवान होतो.
NQ4 AI Gen2 प्रोसेसरने सुसज्ज Neo QLED 4K टीव्हीमध्ये कोणताही कंटेंट 4K कॉलिटीवर रूपांतरित करण्याची क्षमता आहे. क्वांटम मॅट्रिक्स तंत्रज्ञानावर आधारित हा टीव्ही पँटोन व्हॅलिडेटेड डिस्प्लेसह ट्रू आणि काँट्रास्ट कलर एक्सपेरियन्स देतो. यासह यात डॉल्बी ATMOS सपोर्ट मिळेल. हा टीव्ही एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव प्रदान करतो.
Samsung चे OLED टीव्ही ग्लेअर-फ्री टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. हा टीव्ही कोणत्याही लाईटमध्ये क्लियर आणि डीप ब्लॅक पिक्चर देतो. NQ4 AI Gen2 प्रोसेसर, रिअल डेप्थ एन्हान्सर आणि OLED HDR प्रो सह हा टीव्ही पिक्चर कॉलिटीला एक वेगळीच आकर्षकता प्रदान करतो.
Samsung चे QLED TV Quantum Dot Technology ने सुसज्ज असतात. यासह कोणत्याही ब्राइटनेस लेव्हलवर 100% कलर व्हॉल्यूम सुनिश्चित केला जातो. हे स्मार्ट टीव्ही स्लिम आणि स्टायलिश डिझाइनने कोणत्याही घराचे सौंदर्य आणखी खुलते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.