Best Smart TV under 25K: भारतीय बाजारात वेगवेगळ्या फीचर्स आणि किमतींसह स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. यामुळे, चांगल्या फीचर्ससह येणाऱ्या टीव्हीची निवड करणे, अधिक कठीण झाले आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स असलेला स्मार्टटीव्ही शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला काही खास 43-इंच टीव्हीबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्ट टीव्हीची किंमत 25000 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Also Read: आगामी Realme GT 7 चे भारतात लाँचिंग कन्फर्म! पॉवरफुल बॅटरीसह मिळतील अनेक आकर्षक फीचर्स
Redmi च्या या स्मार्ट टीव्हीची खरी किंमत 25,999 रुपये इतकी आहे, तुम्ही हा टीव्ही Amazon सह मोठ्या ऑफरसह खरेदी करू शकता. टीव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टीव्हीमध्ये विविड पिक्चर इंजिनसह डिस्प्ले आहे. यासह, तुम्हाला अलेक्सा आणि प्राइम व्हिडिओ सारख्या अनेक OTT ऍप्सचा ऍक्सेस आहे. याशिवाय, टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ, DTS व्हर्च्युअल एक्स आणि DTS-HD ला सपोर्ट करणारे 24W चे स्पीकर्स आहेत.
Vu GloQLED Series 4K QLED Smart Google TV ची किंमत 23,990 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या TV वर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, टीव्हीवर 1,163 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vu चा हा स्मार्ट टीव्ही 4K क्वांटम डॉट डिस्प्ले, अॅक्टीव्हॉइस रिमोट कंट्रोल, Netflix आणि गुगल असिस्टंटने सुसज्ज आहे. यासह तुम्ही तुमच्या आवाजाने डिवाइस नियंत्रित करू शकता. अखंड कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ, HDMI आणि USB पोर्ट देण्यात आले आहेत.
Hisense 4K Ultra HD Smart LED TV या टीव्हीची किंमत 22,999 रुपये आहे. यावर 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. यावर 1,115 रुपयांचा EMI दिला जात आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Hisense च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 60Hz 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले आहे. या टीव्हीमध्ये गुगल टीव्ही OS, गुगल असिस्टंट, स्क्रीन मिरर, मिराकास्ट, स्लीप टाइमर आणि OTT ऍप्सचा ऍक्सेस आहे. याशिवाय, टीव्हीमध्ये 24W चे स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी डिजिटलने सुसज्ज आहेत.