Vodafone Idea
भारतातील प्रसिद्ध आणि तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea (VI) ने आपल्या ग्राहकांसाठी अप्रतिम प्लॅन्स ऑफर करत असते. दरम्यान, कंपनीने एक नवीन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत 209 रुपये इतकी आहे. हा प्लॅन अनेक अप्रतिम बेनिफिटसह सादर करण्यात आला आहे. यात डेटा, कॉलिंग, SMS आणि अमर्यादित कॉलर ट्यूनचा ऍक्सेस आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसारखाच आहे. पहा तपशील-
Also Read: प्रतीक्षा संपली! WhatsApp स्टेटससह जोडता येईल आवडते गाणे, जबरदस्त फीचर लवकरच होणार दाखल
Vodafone Idea कंपनीने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 209 रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला आहे. हा एक परवडणारा आणि प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारा प्लॅन आहे. हा प्लॅन जवळपास एक महिना म्हणेजच संपूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये 2GB डेटाचा लाभ देखील मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळेल.
होय, वापरकर्ते वैधतेदरम्यान कोणत्याही नेटवर्कवर संपूर्ण 28 दिवस अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ घेण्यास सक्षम असतील. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये 300SMS चा लाभ देखील मिळणार आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये मध्यरात्री 12 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अमर्यादित डेटाचा लाभ मिळणार आहे. याव्यतिरिक्त, सोमवार ते शुक्रवारपर्यंतचा उर्वरित डेटाचा लाभ शनिवार-रविवारी विकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत घेता येईल.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
लक्षात घ्या की, दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर डेटाची स्पीड 64Kbps पर्यंत असणार आहे. तर, दैनिक SMS कोटा संपल्यानंतर, लोकल/STD SMS साठी 1/1.5 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीचा नवीन 209 रुपयांचा प्लॅन 109 रुपयांच्या प्लॅन सारखेच फायदे ऑफर करतो. 109 रुपयांच्या प्लॅनमध्येही वापरकर्त्यांना 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 2GB डेटा आणि 300SMS चा लाभ मिळतो.