Vodafone Idea New Plan: कंपनीने सादर केला 169 रुपयांचा नवीन प्लॅन, Disney+Hotstar सबस्क्रिप्शन Free 

Vodafone Idea New Plan: कंपनीने सादर केला 169 रुपयांचा नवीन प्लॅन, Disney+Hotstar सबस्क्रिप्शन Free 
HIGHLIGHTS

Vodafone Idea ने लाँच केला 169 रुपयांचा प्लॅन

हा Vodafone Idea चा नवीन एन्टरटेंमेंट प्लॅन आहे.

169 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar मोबाइलचे सबस्क्रिप्शन मिळेल.

Vodafone Idea म्हणजेच VI ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. VI कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध आकर्षक प्लॅन्स सादर करत असते. आता या पोर्टफोलिओमध्ये कंपनीने आणखी एक 169 रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सर्व महत्त्वाच्या बेनिफिट्ससह या स्वस्त प्लॅनमध्ये यूजर्सना मनोरंजनासाठी OTT ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स-

हे सुद्धा वाचा: BSNL वापरकर्त्यांसाठी Good News! आता 999 रुपयांच्या प्लॅनची वैधता देखील वाढली, मिळतात Unlimited बेनिफिट्स

Vodafone Idea
Vodafone Idea

Vodafone Idea चा 169 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या या नवीन प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 169 रुपये आहे. हा प्लॅन संपूर्ण 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Vodafone Idea चा नवीन एन्टरटेंमेंट प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एक महिन्याची वैधता, डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन मिळेल. VI चा हा प्लॅन तुम्हाला OTT च्या स्वरूपात Disney + Hotstar मोबाइलची मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो. तुम्हाला हे सबस्क्रीप्शन पूर्ण 90 दिवसांसाठी म्हणजे 3 महिन्यांसाठी मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, Vodafone Idea (Vi) च्या 169 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये 8GB डेटा सुविधेचा समावेश देखील आहे. हा 8GB डेटा तुम्ही महिनाभर वापरू शकता. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये कॉलिंग बेनिफिट उपलब्ध नाहीत. त्यामुळे, कॉलिंगचा आनंद घेण्यासाठी, तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची ​​आवश्यकता असेल. तसेच, तुम्ही डेटासह मोफत OTT सबस्क्रिप्शनसह प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

Vodafone Idea recharge plans
Vodafone Idea recharge plans

Vodafone Idea चा 155 रुपयांचा प्लॅन

वरील प्लॅनसोबत तुम्हाला दररोज डेटा आणि कॉलिंगची सुविधा हवी असेल तर, त्यासाठी 155 रुपयांचा प्लॅन तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता मिळेल. 24 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये 1GB डेटा ऍक्सेस आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ देखील मिळेल. तसेच, वैधतेदरम्यान तुम्हाला 300SMS मिळणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo