BSNL वापरकर्त्यांसाठी Good News! आता 999 रुपयांच्या प्लॅनची वैधता देखील वाढली, मिळतात Unlimited बेनिफिट्स 

BSNL वापरकर्त्यांसाठी Good News! आता 999 रुपयांच्या प्लॅनची वैधता देखील वाढली, मिळतात Unlimited बेनिफिट्स 
HIGHLIGHTS

BSNL 999 रुपयांच्या प्लॅनच्या वैधतेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

BSNL 999 रुपयांचा प्लॅन दीर्घकालीन वैधतेसह येतो.

नवीनतम ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना 15 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर केली जात आहे.

प्रसिद्ध सरकारी टेलिकम दिग्गज BSNL ने अलीकडेच त्यांच्या 699 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता वाढवली आहे. आता कंपनीने आणखी एका प्लॅनची ​​वैधता वाढवली आहे. होय, युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे कारण कंपनीने 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक्सट्रा बेनिफिट दिला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हा BSNL चा प्लॅन एक्स्टेंशन पॅक आहे. यापूर्वी कंपनी या प्लॅनमध्ये 200 दिवसांची वैधता देत होती. चला तर मग बघुयात 999 रुपयांच्या प्लॅनशी संबंधित सर्व तपशील.

BSNL Rs 699 and BSNL Rs 999 Plans with Increased Validity
#BSNL Rs 699 and BSNL Rs 999 Plans with Increased Validity

BSNL चा 999 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे तर हा कंपनीचा प्लॅन एक्स्टेंशन पॅक आहे. या प्लॅनची ​​वैधता 200 दिवसांची आहे. नवीनतम ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना 15 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर केली जात आहे. नवीन ऑफरनंतर आता यूजर्सना 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 215 दिवसांची वैधता मिळेल.

BSNL च्या 999 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सपोर्ट मिळतो. या अंतर्गत वापरकर्ते लोकल आणि STD कॉलचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये PRBT 2 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. कंपनीचा हा प्लॅन ​ 200 दिवसांच्या वैधतेसह येतो. मात्र, नवीन ऑफर अंतर्गत, या प्लॅनची वैधता 215 दिवसांची आहे.

BSNL चा 699 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, BSNL कंपनीने नुकतीच ही ऑफर 699 रुपयांच्या प्लॅनसह सादर केली होती. या नवीन ऑफर अंतर्गत, फोनमध्ये अतिरिक्त वैधता उपलब्ध झाली आहे. 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 130 दिवसांची वैधता मिळत होती. मात्र, नवीन ऑफरदरम्यान त्यात 20 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. त्यानुसार, हा प्लॅन 150 दिवसांची वैधता प्रदान करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo