Exclusive recharges offer available only on the Vi App
प्रसिद्ध टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडिया म्हणजेच VI ने नया प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या लेटेस्ट प्लॅनची किंमत केवळ 45 रुपये आहे. हा एक व्हॅल्यू-एडेड पॅक आहे आणि यात 180 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये अप्रतिम बेनिफिट मिळणार आहे. याआधीही कंपनीने काही अप्रतिम प्लॅन्स लाँच केले आहेत.
VI चा 45 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा व्हॅल्यू ऍडेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 180 दिवसांसाठी तुम्हाला मिस्ड कॉल अलर्टची सुविधा दिली जाणार आहे. अर्थात जेव्हा वापरकर्ते कॉल चुकवू किंवा उचलू शकत नाहीत तेव्हा त्यांना Vi च्या अधिकृत मोबाइल ऍपवर मिस्ड कॉल अलर्ट मिळणार आहे. लक्षात घ्या की, या रिचार्ज प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि OTT सारखे लाभ मिळणार नाहीत.
तुम्हाला हा प्लॅन कंपनीच्या ऍपच्या Others विभागात मिळेल. 45 रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त, Others विभागात 47 रुपयांपासून 429 रुपयांपर्यंतचे प्लॅन उपलब्ध आहेत. यापैकी अनेक प्रीपेड पॅकमध्ये कॉलिंग आणि मर्यादित डेटा दिला जात आहे, तर अनेकांमध्ये SMS सुविधा देखील मिळणार आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने अलीकडेच 'महा रिचार्ज स्कीम' देखील ऑफर केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 5GB डेटा फ्री मिळत आहे. या प्लॅन्सबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी VI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.