Vodafone Idea च्या ग्राहकांना मिळतोय मोफत 75GB डेटा, जाणून घ्या काय आहे ऑफर

Updated on 16-Aug-2022
HIGHLIGHTS

VI दोन प्लॅनमध्ये देणार अतिरिक्त डेटा

2,889 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये 75GB अतिरिक्त डेटा

Vi च्या 1,449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता उपलब्ध

Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी ऑफरचा बॉक्स आणला आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vi आपल्या प्री-पेड ग्राहकांना 75GB अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. Vi ची ही ऑफर दोन प्रमुख प्री-पेड प्लॅन्ससह उपलब्ध आहे. Vi च्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा देखील मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. 

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Xiaomi च्या 108MP कॅमेरा असलेल्या 5G फोनवर मिळतेय 6,500 रुपयांपर्यंत सूट

Vodafone Idea च्या 'या' दोन प्लॅनमध्ये तुम्हाला 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा मिळेल

Vi ने कोणताही नवीन प्लॅन लाँच केलेला नाही, पण दोन जुन्या प्लॅनसह 75 GB डेटा देण्याची घोषणा केली आहे. आम्ही Vi च्या 1,449 आणि 2,889 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत.

VI चा 1,449 रुपयांचा प्लॅन

 Vi च्या 1,449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनमध्ये 50 GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे, जो मोफत आहे.

VI 2,889 रुपयांचा प्लॅन

आता Vodafone Idea च्या 2,889 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये 100 SMS दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 1.5GB डेटा दररोज मिळत आहे. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची असेल आणि त्यात 75GB अतिरिक्त डेटा मिळेल. Vodafone Idea ने ही ऑफर 2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सादर केली आहे.

तुम्हाला Vi Hero Unlimited ऑफरचे फायदे देखील मिळतील

हा प्लॅन खरेदी करणाऱ्या Vi ग्राहकांना Hero Unlimited ऑफर देखील मिळेल. ज्यात वीकेंड डेटा रोलओव्हर, Binge All Night आणि Data Delight यांचा समावेश आहे. वीकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत, ग्राहक आठवड्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण आठवड्यातील उर्वरित डेटा वापरण्यास सक्षम असतील. Binge All Night सुविधेमुळे ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हाय-स्पीड डेटा मोफत वापरता येईल. त्याबरोबरच, Data Delights अंतर्गत ग्राहकांना दरमहा 2 GB आपत्कालीन डेटा मिळू शकेल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :