Vodafone Idea ने आणला 99 रुपयांचा नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन, बघा काय मिळेल खास…

Updated on 31-Jan-2023
HIGHLIGHTS

Vi कंपनीने 99 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला.

यामध्ये तुम्हाला फुल टाइम टॉकटाईम मिळेल.

VI ची 5GB फ्री डेटाची ऑफर 7 फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध

Vodafone Idea (Vi) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन परवडणारी प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची ​​किंमत फक्त 99 रुपये आहे. Airtelने अलीकडेच आपल्या स्वस्त 99 रुपयांच्‍या प्‍लॅनला 155 रुपयांच्‍या प्‍लॅनने बदलले आहे. यानंतर प्रतिस्पर्धी Vi कंपनीने 99 रुपयांचा हा नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे.

हे सुद्धा वाचा : WhatsApp चे अप्रतिम सिक्रेट आणि महत्त्वाचे फीचर्स तुम्हाला माहिती आहेत का?

Vodafone Idea (Vi) च्या या नवीन प्लॅनची ​​किंमत फक्त 99 रुपये आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये आता फक्त Vi कंपनी 99 रुपयांचा प्लॅन देत आहे. एअरटेलने आता 9 सर्कलमध्ये 99 रुपयांचा प्लॅन 155 रुपयांपर्यंत केला आहे. तर, Jio कंपनीचा सर्वात कमी किमतीचा मासिक प्लॅन 129 रुपयांचा आहे. चला जाणून घेऊया Vi च्या 99 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणते फायदे मिळणार आहेत.

Vi चा 99 रुपयांचा प्लॅन

Vi कंपनीचा 99 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 99 रुपयांचा फुल टॉकटाइम मिळेल. 99 रुपयांचा पूर्ण टॉक-टाइम वापरल्यानंतर, या प्लॅनमध्ये 2.5 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाते. डेटासाठी, हा प्लॅन 200MB इंटरनेट सुविधा देतो. मात्र, या प्लॅनमध्ये SMS चा लाभ समाविष्ट नाही.

Vi कंपनीने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत यूजर्सना 5GB फ्री डेटा ऑफर करण्यात येत आहे. या ऑफरचा लाभ फक्त अशा वापरकर्त्यांनाच दिला जाईल, ज्यांनी 7 फेब्रुवारी 2023 पूर्वी Vi ऍपद्वारे त्यांचा Vodafone Idea नंबर रिचार्ज केला आहे. याशिवाय, ही ऑफर केवळ 299 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर वैध आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :