Vi unlimited data plan: 17 രൂപയ്ക്കും 57 രൂപയ്ക്കും ഇനി അൺലിമിറ്റഡ് ഡാറ്റ
वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अनेक टेलिकॉम कंपन्या बाजारात त्यांचे सर्वोत्तम प्लॅन्स आणतात. यापैकी एक VI चा 299 रुपयांचा प्लॅन आहे, या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि मोफत SMS चा लाभ मिळतो. जर तुम्ही या प्लॅनने रिचार्ज केला, तर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता उरणार नाही.
हे सुद्धा वाचा : BSNL : 197 रुपयांमध्ये 70 दिवसांची वैधता, कंपनीचा सर्वात किफायतशीर प्लॅन
तुम्हाला कमी पैशात जास्त फायदे मिळावेत असे वाटत असेल, तर Vi चा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 1.5GB डेटा मोफत मिळतो. याशिवाय, यामध्ये तुम्हाला अनेक ऍप्सचे सबस्क्रिप्शनही मिळते. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.
359 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 3GB डेटा मोफत मिळतो. याशिवाय तुम्हाला त्यावर अनेक ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. म्हणजेच हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला कंटाळा येत नाही, तुमच्या मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत.
एकूण 56 दिवसांच्या वैधतेसह 479 चा प्लॅन मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 1.5GB डेटाचा लाभ मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते. याशिवाय, मोफत SMS सुविधा मिळेल.