Reliance Jio Unlimited Offer Extended till 25 may 2025 for free JioHotstar subscription
Jio ने आपल्या वापरकर्त्यांना मोफत OTT चा लाभ मिळावा म्हणून Jio Unlimited ऑफरची वैधता पुन्हा एकदा वाढवली आहे. आता या महिन्यातही वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेण्यास सक्षम शकतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, टेलिकॉम दिग्गज कंपनीने या वर्षी मार्चमध्ये IPL लक्षात घेऊन ही ऑफर सादर केली होती.
ही ऑफर 31 मार्च रोजी संपणार होती, परंतु त्याची वैधता 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती. यानंतर, ऑफरची मुदत पुन्हा 30 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली. आता परत एकदा या ऑफरच्या वैधतेत वाढ केली आहे.
Jio च्या मते, जिओ अनलिमिटेड ऑफर 25 मे 2025 पर्यंत लाइव्ह असेल. या काळात, वापरकर्ते 299 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीचा प्लॅन रिचार्ज करून ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 महिन्यांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. यासह, वापरकर्ते लाईव्ह मॅचेस तसेच त्यांच्या आवडीच्या वेब सिरीज आणि चित्रपटांचा लाभ घेऊ शकतील.
त्याबरोबरच, ऑफरमध्ये OTT सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त होम Wi-Fi देखील 50 दिवसांसाठी मोफत दिले जात आहे. जर वापरकर्त्यांना 50 दिवसांनंतर ही सेवा वापरायची असेल तर, त्यांना 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन घ्यावा लागेल. हा प्लॅन तुम्ही Jio च्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍपवरून खरेदी करू शकता.
टेलिकॉम कंपनी Jio ने या वर्षी मार्चमध्ये 100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. या प्रीपेड प्लॅनला 90 दिवसांची वैधता दिली जात आहे. यामध्ये इंटरनेट वापरण्यासाठी 5GB डेटा दिला जात आहे. तसेच, JioHotstar सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जात आहे. या प्लॅनची वैधता तब्बल 90 दिवसांची आहे. मात्र, या प्लॅनमध्ये इतर प्रीपेड प्लॅनप्रमाणे कॉलिंग आणि SMS ची सुविधा नाही. हा प्लॅन तुम्हाला फक्त डेटा लाभ देतो.