Reliance jio discontinues popular 3 cheapest value recharge plans
आपणा सर्वांना माहितीच आहे की, अलीकडेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना केवळ व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स प्रदान करण्याचे निर्देश दिले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये कोणतीही डेटा सुविधा नसेल. पण यात अमर्यादित कॉलिंग आणि SMS चे बेनिफिट्स मिळतील. TRAI च्या आदेशानुसार, नुकतेच Airtel, Jio आणि Vi ने त्यांचे व्हॉईस ओन्ली प्लॅन्स सादर केले आहेत. मात्र, Jio ने ग्राहकांना आणखी एक धक्का दिला आहे.
होय, लक्षात घ्या की, नवे प्लॅन्स लाँच केल्यानंतर रिलायन्स Jio ने त्यांचे तीन व्हॅल्यू प्लॅन्स बंद केले आहेत. कंपनीने 189 रुपये, 479 रुपये आणि 1899 रुपयांचे प्लॅन्स बंद केले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे प्लॅन्स अशा वापरकर्त्यांसाठी होते, ज्यांना कॉलिंगसह काही प्रमाणात डेटा देखील आवश्यक आहे. या प्लॅन्सऐवजी आता केवळ दोनच व्हॉईस-ओन्ली प्लॅन्स सुरू झाले आहेत.
Jio च्या 189 रुपयांच्या प्लॅनची किंमत 189 रुपये होती. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये एकूण 2GB इंटरनेट डेटा मिळत होता. जो 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध होता. डेटाव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि एकूण 300SMS चे बेनिफिट्स देण्यात आले आहेत.
रिलायन्स Jio च्या या प्लॅनची किंमत 479 रुपये होती. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये एकूण 6GB इंटरनेट डेटा देण्यात येत होता. डेटा व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि दररोज एकूण 100SMS ची सुविधा मिळत होती. हा प्लॅन तुम्हाला जवळपास तीन म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेसह मिळत होता.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
Jio चा 1899 रुपयांचा प्लॅन हा एक दीर्घ वैधतेसह येणार प्लॅन होता. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 336 दिवसांची वैधता मिळत होती. या वैधतेदरम्यान वापरकर्त्यांना एकूण 24GB डेटा ऑफर केला जात होता. एवढेच नाही तर, या डेटा आणि वैधतेव्यतिरिक्त या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचे बेनिफिट देखील मिळत होते.