jio plans
प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Jio कंपनीने देखील TRAI च्या आदेशांचे पालन करत, आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये व्हॉईस/SMS ओन्ली प्लॅन्स सुरु केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच कंपनीने 458 आणि 1958 रुपयांचे दोन व्हॅल्यू पॅक सुरू केले आहेत. तर, आता कंपनीने 1958 रुपयांचा प्लॅन या यादीतून रिमूव्ह केला आहे. त्याऐवजी कंपनीने दुसरा प्लॅन सुरू केला आहे.
नवा प्लॅन कंपनीने 1748 रुपयांमध्ये लाँच केला आहे. लक्षात घ्या की, या प्लॅन्सचे फायदे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. किंमतीनुसार, नवीन प्लॅन आपल्याला जुन्या प्लॅनपेक्षा कमी बेनिफिट देतो. जाणून घेऊयात किंमत आणि बेनिफिट्स-
रिलायन्स Jio ने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 1748 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन समाविष्ट केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा 1,958 रुपयांच्या प्लॅन आहे. या नवीन प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. विशेष म्हणजे 1,958 रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांना 1 वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी वैधता प्रदान करत होता. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा लाभ मिळणार नाही.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
1748 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा प्रदान करते. ही कॉलिंग संपूर्ण वैधतेदरम्यान म्हणजेच 336 दिवसांपर्यंत आहे. या व्यतिरिक्त, हा प्लॅन 3600 SMS ची सुविधा प्रदान करते. या प्लॅनमध्ये इतर बेनिफिट्सदेखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये JioCinema, JioTV आणि Jio Cloud फायदे समाविष्ट आहेत. हा नवीन प्लॅन वापरकर्त्यांना केवळ कॉलिंग आणि SMS फायदे प्रदान करते.
वर सांगितल्याप्रमाणे, नवीन प्लॅन 1958 रुपयांच्या प्लॅनसह बदलण्यात आला आहे. आधीच्या प्लॅनमधील फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनचे फायदे जवळपास 1748 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध होती. तर, त्यासोबतच या प्लॅनमध्ये 3600SMS पाठवले जाऊ शकतात. लक्षात घ्या की, दोन्ही प्लॅनमधील फरक फक्त वैधता आणि किमतीमधील आहे.