JioHotstar free with jio plans
Jio New Plan: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन डेटा पॅक लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या पॅकचा उद्देश केवळ ग्राहकांना अतिरिक्त डेटा देणे नाही तर, डेटासह JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन प्रदान करणे देखील आहे. या सबस्क्रिप्शनसह, वापरकर्ते कोणतेही अतिरिक्त पैसे न देता फक्त रिचार्ज करून क्रिकेट हंगामातील सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकतील. तुम्हाला सांगतो, नुकतेच ICC Champions Trophy 2025 सुरू झाली आहे. या स्पर्धेचे ऑनलाइन स्ट्रीमिंग JioHotstar वर केले जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या प्लॅनची किंमत-
रिलायन्स जिओने नवा Jio रिचार्ज प्लॅन 195 रुपयांमध्ये लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio च्या या नवीन डेटा पॅकमध्ये वापरकर्त्यांना 15GB ऑफर केला जात आहे. लक्षात घ्या की, डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. वर सांगितल्यापप्रमाणे या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना लाईव्ह क्रिकेट सामने पाहण्यासाठी JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
हे सबस्क्रिप्शन पूर्ण तीन महिने म्हणजेच 90 दिवसांसाठी उपलब्ध असेल. महत्त्वाचे म्हणजे या पॅकसह, वापरकर्ते क्रिकेट हंगामातील सर्व सामने मोफत ऑनलाइन पाहण्यास सक्षम असतील. तसेच, महत्त्वाचे लक्षात घ्या की, या प्लॅनसोबतच वापरकर्त्यांना बेस प्लॅनची देखील आवश्यकता असेल. ज्या प्लॅनमध्ये दीर्घ वैधता, डेटा आणि कॉलिंगचे फायदे देखील मिळतील.
अलीकडेच JioCinema आणि Hotstar चे विलीनीकरण केले आहे. त्यानंतर, JioHotstar हे नवे OTT ऍप उदयास आले आहे. त्यानंतर, जिओने आपल्या निवडक प्रीपेड प्लॅनमध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन देखील जोडले आहे. जिओ कंपनी त्यांच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 949 रुपयांचा प्लॅन देखील सादर करते, ज्याची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाचा समावेश आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 100 मोफत SMS देखील पाठवू शकता. तसेच, यात जिओहॉटस्टार मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन देखील आहे, जे 84 दिवसांसाठी उपलब्ध असेल.