jio
भारतातील सर्वात आघाडीची टेलिकॉम दिग्गज Jio मागील काही काळापासून सतत बातम्यांचा भाग बनलेली आहे. कारण, अलीकडेच कंपनीने नवे व्हॉइस ओन्ली प्लॅन्स लाँच केले तर, काही प्लॅन्स रिमूव्ह केले. त्याबरोबरच, स्वस्त 189 रुपयांचा प्लॅन परत लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, आता आणखी एक अपडेट आले आहे, ज्यामुळे Jio युजर्सना परत झटका मिळाला आहे. होय, कारण आता कंपनीने 69 आणि 139 रुपयांच्या डेटा पॅक वैधतेमध्ये मोठा बदल केला आहे.
Also Read: खुशखबर! अप्रतिम बेनिफिट्ससह Jio चा स्वस्त प्लॅन साईटवर पुन्हा सूचिबद्ध, जाणून घ्या किंमत
आम्ही तुम्हाला सांगतो की, या अपडेटमुळे वापरकर्त्यांना मर्यादित कालावधीसाठी डेटा मिळेणार आहे. आता या 69 आणि 139 रुपयांच्या डेटा प्लॅनची वैधता पूर्वीच्या प्लॅन्ससारखी राहणार नाही. जाणून घेऊयात सविस्तर-
रिलायन्स Jio चा 69 रुपयांचा प्लॅन हा कंपनीचा डेटा बूस्टर प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी 6GB डेटा ऑफर केला जातो. आता या पॅकमध्ये फक्त 7 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, तुमच्या नंबरवर प्रीपेड प्लॅन सक्रिय असेल, तेव्हाच हा प्लॅन काम करेल.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio च्या 139 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, या देखील एक डेटा बूस्टर प्लॅन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो के, आता या पॅकमध्ये तुम्हाला फक्त 7 दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच, पॅकमध्ये एकूण 12GB डेटा ऑफर केला जातो. हा पॅक वापरण्यासाठी तुमच्या नंबरवर सक्रिय रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे.
रिलायन्स Jio कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त डेटा व्हाउचर म्हणजे 11 रुपयांचा डेटा व्हाउचर, जो केवळ एका तासाच्या वैधतेसह डेटा ऑफर करतो. त्याबरोबरच, Jio चा 19 रुपयांचा आणखी एक स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला 1 दिवसासाठी 1GB डेटा मिळतो. हे सर्व प्लॅन सर्व Jio वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे प्लॅन्स अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ऍपवरून रिचार्ज करता येतील. रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!