भारतातील आघाडीची टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio च्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. होय, Jio ने आपल्या 448 रुपयांच्या लोकप्रिय प्रीपेड प्लॅनच्या किमतीत कपात केली आहे. युजर्सना आता हा प्रीपेड प्लॅन स्वस्तात रिचार्ज करता येणार आहे. इंटरनेट ब्राउझिंग आणि ऑनलाइन गेमिंगसाठी सुपरफास्ट डेटा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनसह युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या प्लॅनची नवी किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
वर सांगितल्याप्रमाणे, हा Jio प्लॅन 448 रुपयांच्या या प्लॅनची किंमत स्वस्त करण्यात आली आहे. किमतीत कपातीनंतर, या प्लॅनची किंमत आता 445 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स पूर्वीप्रमाणेच आहेत. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी त्यांच्या 445 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटा आणि 100SMS दिले जात आहेत. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग ऑफर केली जाते. यासह तुम्ही इतर टेलिकॉम ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर तासन्तास अखंडितपणे बोलू शकता. या प्लॅनमधील इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात JioTV, Jiocinema आणि Cloud चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
त्याबरोबरच, युजरच्या मनोरंजनाची देखील या प्लॅनमध्ये सोय करण्यात आली आहे. अमर्यादित कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये मनोरंजनासाठी Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi आणि FanCode चा मोफत ऍक्सेस मिळेल.
Jio ने अलीकडेच त्यांच्या 69 आणि 239 रुपयांच्या डेटा पॅकची वैधता कमी केली आहे. या अपडेटनंतर, वापरकर्त्यांना आता या दोन्ही प्लॅनमध्ये निश्चित वेळ मर्यादा मिळेल. या डेटा पॅकमध्ये एकूण 6GB डेटा दिला जात आहे, 7 दिवसांची वेळ मर्यादा असेल. तर, आता 139 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 7 दिवसांसाठी 12GB डेटा मिळतो. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.