Reliance Jio 999 prepaid plan offers 2GB daily data, unlimited calls and unlimited 5G data for 98 days
रिलायन्स Jio च्या वापरकर्त्यांसाठी एक चिंताजनक बातमी पुढे आली आहे. मागील वर्षी झालेल्या रिचार्ज प्लॅन्सच्या दरवाढीमुळे आधीच युजर्स टेलिकॉम कंपन्यांवर नाराज आहेत. दरम्यान, Jio ग्राहकांना आणखी एकदा महागाईचा फटका देणार, असे पुढे येत आहे. महिन्यांपूर्वी रिचार्ज प्लॅन्स दर वाढवून सर्वसामान्यांना धक्का दिला होता. आता बातमी आहे की, टेलिकॉम दिग्गज Jio आपल्या स्वस्त 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत तब्बल 100 रुपयांनी वाढवणार आहे.
एका प्रसिद्ध प्रकाशनानुसार, अशी माहिती मिळाली आहे की, रिलायन्स Jio आपल्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनच्या किमतीत वाढ करणार आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 100 रुपयांनी वाढवली जाईल. त्यानंतर ग्राहकांना या प्लॅनसाठी 299 रुपये खर्च करावे लागतील. तुम्हाला समजलेच असेल की, एका रिचार्ज प्लॅनची किंमत तब्बल 100 रुपयांनी वाढणे, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका आहे.
पुढे आलेल्या वृत्तानुसार, उद्या म्हणजेच 23 जानेवारीपासून 199 रुपयांच्या Jio प्लॅन महाग होणार आहे. एवढेच नाही तर, सर्व वापरकर्ते स्वयंचलितपणे नवीन किंमतीवर स्थलांतरित केले जातील. थोडक्यात सांगायचे झाल्यास, जे युजर्स 199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन वापरत होते, त्यांना उद्यापासून या प्लॅनसाठी 299 रुपये खर्च करावे लागतील.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
299 रुपयांच्या नव्या पोस्टपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, जे बेनिफिट्स आधी 199 रुपयांना मिळत होते. ते आता 100 रुपयांनी महागले असले तरी समान बेनिफिट्स 299 रुपयांना मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये एकूण 25GB डेटा दिला जात आहे, जो कोणत्याही दैनिक डेटा मर्यादेशिवाय येईल. Jio वापरकर्ते भारतातील कोणत्याही नंबरवर मोफत व्हॉइस कॉलिंग करू शकतील, त्यामुळे रोमिंग पूर्णपणे मोफत असेल. तसेच, या प्लॅन दररोज 100 SMS चा लाभ देखील उपलब्ध आहे.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, 199 रुपयांच्या प्लॅनचा दर वाढवल्यानंतर 299 रुपयांचा होईल. हा प्लॅन फक्त जुन्या ग्राहकांसाठी सुरू राहील. तर नवीन जिओ पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन 349 रुपयांचा असेल. 349 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना 30GB 5G डेटा मिळतो. यासोबतच भारतभर मोफत अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS देखील उपलब्ध आहेत.