ott
आपणा सर्वांना माहितीच आहे की, Netflix हे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय OTT ॲप आहे. यात वेब-सिरीज आणि वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आहेत, जे पाहून दररोज लाखो सिनेरसिक मनोरंजन करत असतात. या ॲपच्या कंटेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता आहे. मात्र, बहुतेक वापरकर्ते सदस्यत्व योजना घेण्यास टाळाटाळ करतात. म्हणून, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या काही प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये Netflix चे ऍक्सेस मोफत उपलब्ध असेल.
Jio चा 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा आणि 100SMS दिला जात आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. याशिवाय, प्रीपेड पॅकमध्ये नेटफ्लिक्ससह जिओ टीव्ही, सिनेमा आणि क्लाउडमध्ये ऍक्सेस दिला जात आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे अधिकृत ॲप आणि वेबसाइटवरून रिचार्ज केले जाऊ शकते.
रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा!
Airtel च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज 3GB डेटा दिला जात आहे. या पॅकमध्ये 100SMS उपलब्ध आहेत. इतर नेटवर्कवर तासनतास बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, मनोरंजनासाठी, प्रीपेड पॅकमध्ये Netflix सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यात अमर्यादित 5G डेटा आणि स्पॅम फाइटिंग नेटवर्क सारखे फायदे यात मिळतील. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे.
हा Vodafone Idea चा डेटा प्लॅन आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात येत आहे. जास्त इंटरनेट वापरासाठी, या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जात आहे. या पॅकमध्ये 100SMS देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, या प्लॅनमध्ये Netflix चा ॲक्सेस देखील दिला जात आहे, ज्याद्वारे यूजर्स फोन आणि टीव्हीवर कंटेंट पाहू शकतात. याशिवाय, वीकेंड डेटा रोलओव्हरसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे.