JioCinema New Plan: कंपनीने लाँच केला नवा Affordable प्लॅन, वार्षिक वैधतेसह घेता येईल OTT मजा

Updated on 27-May-2024
HIGHLIGHTS

JioCinema वापरकर्त्यांसाठी कंपनीने आणखी एक नवा प्लॅन लाँच केला आहे.

स्वस्त किमतीत तुम्हाला प्रीमियम कंटेंटचा ॲक्सेस संपूर्ण वर्षभाराच्या वैधतेसह मिळेल.

Jio ने गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये ॲड-फ्री प्लॅन सादर केला होता.

Jiocinema New Plan: प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म JioCinema वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम दिग्गज Jio ने प्रीमियम वार्षिक प्लॅन लाँच केले आहेत. नव्या प्लॅनची किंमत कंपनीने 300 रुपयांपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे स्वस्त किमतीत तुम्हाला प्रीमियम कंटेंटचा ॲक्सेस संपूर्ण वर्षासाठी पूर्णपणे मोफत दिला जात आहे. JioCinema ची वाढती लोकप्रियता बघता कंपनीने अलीकडेच काही अप्रतिम प्लॅन्स लाँच केले आहेत.

Also Read: BSNL Plan: आता 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल Unlimited सुपर हाय-स्पीड डेटा, बघा सर्व डिटेल्स

आम्ही तुम्हाला सांगतो की, टेलिकॉम कंपनी Jio ने गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये ॲड-फ्री प्लॅन सादर केला होता. या प्लॅनची किंमत 29 रुपये आहे. हे सब्स्क्रिप्शन तुम्हाला मासिक वैधतेसह देखील मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता नव्या वार्षिक प्लॅनची किंमत आणि बेनिफिट जाणून घेऊयात-

JioCinema new annual plan

JioCinema Premium Annual Plan

JioCinema च्या या नवीन प्रीमियम प्लॅनची ​​किंमत 299 रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत हा पॅक वर्षभरासाठी खरेदी करता येईल. यामध्ये HBO, Paramount, Peacock आणि Warner Brothers चे चित्रपट आणि सिरीज 4K व्हिडिओ फॉरमॅटमध्ये जाहिरातीशिवाय (ऍड-फ्री) पाहता येतील. वापरकर्ते चित्रपट आणि वेब सीरीज ऑनलाइन डाउनलोड करू शकतात आणि ऑफलाइन पाहू शकतात.

लक्षात घ्या की, JioCinema चा हा ऍड-फ्री प्लॅन केवळ 1 डिव्हाइससाठी सादर करण्यात आला आहे. म्हणजेच तुम्हाला एकाच फोनमध्ये प्रीमियम कंटेंट पाहण्याची सुविधा मिळेल. हा प्लॅन तुम्ही JioCinema चा हा नवीन 299 चा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हा पॅक अधिकृत वेबसाइट आणि App वरून रिचार्ज केला जाऊ शकतो.

JioCinema चा 29 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, JioCinema चा 29 रुपयांचा प्रीमियम प्लॅन हा एक मासिक प्लॅन आहे. प्लॅन 4K कंटेंट, ऍड-फ्री व्युइंग, ऑफलाइन पाहण्याचे पर्याय, विशेष सिरीज, चित्रपट, हॉलीवूड, किड्स अँड टीव्ही एंटरटेनमेंट इ. ॲक्सेस मिळेल. लक्षात घ्या की, हा प्लॅन ऍड-फ्री नाही किंवा क्रीडा आणि लाईव्ह चॅनेलसाठी उपलब्ध नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :