Jio चे सुपर प्लॅन्स ! Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar अगदी मोफत, बघा यादी

Jio चे सुपर प्लॅन्स ! Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar अगदी मोफत, बघा यादी
HIGHLIGHTS

OTT सबस्क्रिप्शनसह येणारे JIOचे जबरदस्त प्लॅन्स

OTT सबस्क्रिप्शन संपूर्ण एका वर्षाच्या वैधतेसह उपलब्ध

प्लॅन्सची किंमत 399 रुपयांपासून सुरु

OTT ची क्रेझ आता लोकांमध्ये वाढत चालली आहे. आजकाल प्रत्येकजण रिचार्ज करण्यापूर्वी त्या प्लॅनसह किती OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता आहे, हे चेक करूनच रिचार्ज करतो. अशा परिस्थितीत, तुम्ही  Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar या तिन्ही प्लॅन्सचे मोफत सबस्क्रिप्शन देणारे प्लॅन्स शोधत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. या लेखात आम्‍ही तुम्‍हाला JIO च्‍या प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, जे या तीन प्‍लॅटफॉर्मचे एकाच वेळी संपूर्ण एक वर्षाचे सब्‍स्क्रिप्शन देतात. 

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy Watch 5 आणि Watch 5 pro भारतात लाँच,जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

JIO चा 399 रुपयांचा प्लॅन

JIO पोस्टपेड प्लस प्लॅनमध्ये यूजर्सना दरमहा 75 GB डेटा मिळतो. जर तुमचा डेटा संपला तर प्रत्येक 1 GB डेटासाठी 10 रुपये आकारले जातात. डेटा व्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि SMS सारखे फायदे देखील मिळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. 

JIO चा 599 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन तुम्हाला 100GB इंटरनेट, दररोज 100 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे.

JIO प्लॅनची ​​किंमत 799 रुपये आहे

799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150GB डेटा आणि 200GB रोलओव्हर डेटा दिला जात आहे. या फॅमिली प्लॅनमध्ये तुम्हाला दोन अतिरिक्त सिम कार्ड, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित SMSची सुविधा दिली जात आहे. Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे सदस्यत्व देखील या प्लॅनमध्ये मिळणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo