jio new year offer
टेलिकॉम दिग्गज आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत शीर्षस्थानी मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स Jio नेहमीच बातम्यांमध्ये असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच Jio ने ‘न्यू इयर ऑफर’ अंतर्गत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला. लक्षात घ्या की, या प्लॅनची किंमत 2025 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा प्लॅन दीर्घ वैधतेसह येणारा प्लॅन आहे. मात्र, हा प्लॅन मर्यादित काळासाठी सादर करण्यात आला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही, रिलायन्स Jio ने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 2025 हा नवीन वर्षाचा वेलकम प्लॅन सादर केला. परंतु, महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दीर्घकालीन प्लॅन शोधत असाल, तर हा एक आकर्षक पर्याय असेल. ही ऑफर केवळ दोन दिवसांपर्यंत वैध आहे. त्यामुळे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल.
या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये प्रीपेड ग्राहकांना 200 दिवसांची दीर्घकालीन वैधता मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G इंटरनेट आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. मात्र, ज्यांच्याकडे 4G कनेक्शन आहे, त्यांना दररोज 2.5GB डेटा मिळणार आहे. त्यानुसार, तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान, एकूण 500GB डेटा मिळेल. संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना दररोज 100SMS देखील मिळतील.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
याव्यतिरिक्त, Jio न्यू इयर वेलकम प्लॅन विविध कूपन बेनिफिट्स देखील देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्राहकांना 500 रुपये किमतीचे Ajio कूपन मिळण्यास पात्र आहे. हे कुपन किमान 2,500 रुपयांच्या खरेदी मूल्यावर वापरता येईल. तर, 499 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या स्विगी ऑर्डरवर 150 रुपयांचे व्हाउचर दिले जाईल. त्याबरोबरच, Easemytrip.com च्या मोबाइल ऍप आणि वेबसाइटवर केलेल्या फ्लाइट बुकिंगवर 1500 रुपयांची सूट दिली जाईल. हे कूपन MyJio ऍपवरून उपलब्ध असतील.