आपणा सर्वांना माहितीचा की, रिलायन्स Jio ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक उत्तम प्लॅन्स आहेत. या सर्वांमध्ये हाय-स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग दिले जाते. एवढेच नाही तर, या प्लॅन्समध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी OTT ऍक्सेस देखील मिळतो. जर तुम्ही जिओ वापरकर्ता असाल आणि स्वतःसाठी उत्तम फायदे असलेला प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात.
कारण या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या Jio च्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला 900GB पेक्षा जास्त डेटा आणि मोफत OTT सारख्या सुविधा मिळणार आहेत.
कथित Jio प्लॅनची किंमत 1299 रुपये इतकी आहे. हा कंपनीचा एक लोकप्रिय प्लॅन आहे. या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि 100 दिले जात आहेत. इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ऍपवरून म्हणजेच माय जियो ऍपवरून रिचार्ज करता येईल.
एवढेच नाही तर, वापरकर्त्यांचे मनोरंजन लक्षात घेऊन या रिचार्ज प्लॅनमध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन मिळणार आहे. हे सबस्क्रिप्शन देखील एक दोन नव्हे तर तब्बल 3 महिन्यांसाठी दिले जात आहे. याद्वारे, वापरकर्ते त्यांच्या फोनवर लाईव्ह सामने, नवीनतम वेब सिरीज आणि चित्रपट पाहू शकतील.
केवळ JioHotstar च नाही तर, प्रीपेड प्लॅनमध्ये Netflix सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जात आहे. या प्लॅन मधील विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये 5G अमर्यादित डेटा देखील मिळत आहे. या पॅकमध्ये, 50GB JioAICloud स्टोरेज मोफत उपलब्ध आहे.
Jio च्या स्वस्त OTT प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, Jio कडे आपल्या वापरकर्त्यांसाठी 195 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला 15GB डेटा दिला जात आहे. जर तुमची डेटा मर्यादा वैधतेआधी संपली तर, डेटा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. प्लॅनमधील OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये देखील JioHotstar सबस्क्रिप्शन संपूर्ण 90 दिवसांसाठी प्लॅनमध्ये दिले जात आहे.