Reliance Jio Rs 11 plan
भारतीय टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio आपल्या ग्राहकांना अप्रतिम बेनिफिट्ससह सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन ऑफर करते. Jio प्लॅन्समध्ये केवळ डेटा कॉलिंगच नाही तर OTT बेनिफिट्स आणि अनेक सुविधा दिल्या जातात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या दररोज 2.5GB डेटासह येणाऱ्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. या प्लॅनची किंमत 399 रुपये इतकी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्स-
Also Read: New! आगामी iQOO Neo 10R ची किंमत लाँचपूर्वीच जाहीर, तुमच्या बजेटमध्ये येईल का नवा स्मार्टफोन?
Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये जर तुम्हाला स्वस्त 2.5GB दैनिक डेटाची सुविधा मिळणार आहे. त्याबरोबरच, या Jio प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, रिलायन्स Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS चा लाभ देखील दिला जात आहे.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर तुम्ही Jio चा हा प्लॅन वापरत असाल तर, तुम्ही तुमची दैनंदिन डेटा मर्यादा पूर्ण केली असेल, तर काळजी करू नका. तुम्ही Jio 5G पात्र युजर असाल तर, तर तुम्हाला अमर्यादित डेटा लाभ मिळत राहील. 5G पात्र युजर नसाल तर, इंटरनेटचा वेग फक्त 64Kbps राहील. प्लॅनमधील इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला JioTV, JioCloud आणि JioCinema चा ऍक्सेस देखील मिळतो.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio कंपनी 2.5GB दैनिक डेटासह फक्त 4 प्लॅन ऑफर करतो. या प्लॅनची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते. याव्यतीरीक्त, Jio चे आणखी तीन प्लॅन उपलब्ध आहेत. हे तिन्ही प्लॅन अनुक्रमे 2025 रुपये, 3,599 रुपये आणि 3,999 रुपयांच्या किमतीत दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये देखील भरपूर डेटासह अमर्यादित कॉलिंगसारखे अप्रतिम बेनिफिट्स मिळतात. तसेच, इतर प्लॅनमध्ये मनोरंजनाची सोय देखील करण्यात आली आहे.