Reliance Jio-AirFiber
Jio Plan: रिलायन्स Jio कडे तुमच्यासाठी अनेक प्रकारचे प्लॅन्स आहेत. कंपनीनकडे एक स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे, जो केवळ तुम्हाला कमी किमतीत डेटा आणि कॉलिंगची सुविधाच नाही तर OTT बेनिफिट देखील देतो. म्हणजेच कथित प्लॅनमध्ये तुमच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. Jio च्या या प्लॅनची किंमत 599 रुपये इतकी आहे.
लक्षात घ्या की, रिलायन्स Jio कडे Jio Airfiber वापरकर्त्यांसाठी 599 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन सर्वात खास आहे, कारण या प्लॅनमध्ये कमी किमतीत अनेक बेनिफिट्स दिले जातात.
रिलायन्स जिओच्या 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 1000GB हाय स्पीड डेटा दिला जातो. हा डेटा तुम्हाला 30Mbps च्या स्पीडसह मिळेल. डेटा व्यतिरिक्त, हा प्लॅन Airfiber वापरकर्त्यांना मोफत अमर्यादित कॉलिंग आणि 800 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल देखील प्रदान करतात. 599 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्लॅनची किंमत 18% GST नंतर 706.82 रुपये असेल. अधिक माहितीसाठी Jio ची अधिकृत साईट किंवा ऍपला व्हिजिट करा.
याव्यतिरिक्त, या Jio AirFiber प्लॅनसह, तुम्हाला Disney Plus Hotstar, Sony Liv, ZEE5, JioCinema Premium, Sun NXT, Hoichoi, Discovery Plus, Alt Balaji, Eros Now, Lionsgate Play आणि ShemarooMe यासह इतर अनेक OTT ऍप्स चा फायदा मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनी 1000 रुपयांच्या मोफत इन्स्टॉलेशनचा लाभ देत आहे आणि ही माहिती कंपनीच्या अधिकृत साइटवर देण्यात आली आहे.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Airtel चा 599 रुपयांचा एक्स्ट्रीम फायबर प्लॅन 30Mbps पर्यंतचा स्पीड, 350 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि Disney+ Hotstar सह 20 हून अधिक OTT ऍप्सची सुविधा देतो. नवीन कनेक्शन घेताना, जर तुम्ही 6 किंवा 12 महिन्यांचा प्लॅन निवडला तर तुम्हाला कोणताही इन्स्टॉलेशन चार्ज द्यावा लागणार नाही. परंतु, जर तुम्ही मासिक प्लॅन निवडला तर तुम्हाला 1500 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज द्यावा लागेल.