HIGHLIGHTS
रिलायन्स JIO भारतातील सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेली टेलिकॉम कंपनी
JIOचा 299 रुपयांचा बेस्ट सेलिंग प्लॅन
प्लॅनमध्ये मिळेल दररोज 2GB डेटा
रिलायन्स JIO भारतातील सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेली टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे अनेक रिचार्ज प्लॅन्ससाठी पर्याय आहेत. यामुळेच कधी कधी योग्य प्लॅन निवडणे कठीण होते. विशेषत: तुम्हाला स्वस्त प्लॅनसह रिचार्ज करायचे असल्यास पूर्वीपेक्षा कमी पर्याय शिल्लक आहेत.
Surveyहे सुद्धा वाचा : मस्तच ! नवीन फीचर्समुळे Whatsapp वापरणे मजेशीर होणार, तुम्ही लेटेस्ट अपडेट डाउनलोड केले का?
जर तुम्हाला दीर्घ वैधतेसाठी रिचार्ज करायचा नसेल आणि 500 रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी सर्वात जास्त आवडलेला स्वस्त प्लॅन घेऊन आलो आहोत. हा प्लॅन सुमारे एक महिन्याच्या वैधतेसह येतो आणि दैनंदिन डेटासह अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे ऑफर करतो.
रिलायन्स JIO ने ऑफर केलेला 299 रुपयांचा प्लॅन 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम आहे. या प्लॅनसह रिचार्ज केल्यावर, ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो आणि हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 56GB डेटा दिला जातो.
दैनंदिन डेटा व्यतिरिक्त, दररोज 100 SMS देखील विनामूल्य उपलब्ध आहेत. याशिवाय Jio मेम्बर्सना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ऍप्सचाही प्रवेश मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64kbps पर्यंत खाली येईल. कंपनीच्या मते, हा सर्वात जास्त आवडला जाणारा स्वस्त प्लॅन आहे.
Bharti Airtel आणि Vodafone-Idea द्वारे 299 रुपये किंमतीचा प्रीपेड प्लॅन देखील ऑफर केला जात आहे. मात्र, या दोन्ही कंपन्या 2GB ऐवजी 1.5GB दैनिक डेटा देतात. अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त, या प्लॅन्समध्ये दररोज SMS सारखे फायदे देखील मिळतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile