मस्तच ! नवीन फीचर्समुळे Whatsapp वापरणे मजेशीर होणार, तुम्ही लेटेस्ट अपडेट डाउनलोड केले का?

मस्तच ! नवीन फीचर्समुळे Whatsapp वापरणे मजेशीर होणार, तुम्ही लेटेस्ट अपडेट डाउनलोड केले का?
HIGHLIGHTS

WhatsApp मध्ये लवकरच येणार अनेक मजेशीर फीचर्स

जर तुम्ही बीटा वापरकर्ता नसाल तर ऍपला नेहमी लेटेस्ट वर्जनवर अपडेट ठेवा.

चॅट विद युअरसेल्फ फिचर लवकरच तुमच्या सुविधेसाठी हजर होणार

लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वापरकर्त्यांना अधिक चांगला चॅटिंग अनुभव देण्यासाठी सतत नवीन फिचर्स जोडत आहे. सर्व वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स आणण्यापूर्वी कंपनी त्यांची बीटा व्हर्जनमध्ये चाचणी करते. अशा प्रकारे, परीक्षकांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे, फीचर्समध्ये बदल आणि सुधारणा केल्या जातात आणि शेवटी ते सर्व वापरकर्त्यांसाठी ऍपचे महत्त्वाचे भाग बनवले जातात.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Google आणखी एक फ्लॅगशिप फोन लाँच करेल, फीचर्स आणि कॅमेरा सेटअपची माहिती लीक

कंपनी Android, iOS आणि डेस्कटॉप प्लॅटफॉर्मवर बीटा वापरकर्त्यांसह अनेक नवीन फीचर्सची चाचणी घेत आहे. यातील काही फीचर्सची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. म्हणजेच लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी स्थिर ऍपचा भाग बनवले जातील. सर्व प्रथम, नवीन फीचर्सचा लाभ घ्या आणि जर तुम्ही बीटा वापरकर्ता नसाल तर ऍपला नेहमी लेटेस्ट वर्जनवर अपडेट ठेवा. 

चॅट विद युअरसेल्फ 

लवकरच युजर्सना स्वतःशी चॅट करण्याचा पर्याय दिला जाईल. हे विचित्र वाटेल, पण या फीचरच्या मदतीने महत्त्वाच्या लिंक्स किंवा नोट्स सेव्ह करणे किंवा मीडिया फाइल्स सेव्ह करणे सोपे होणार आहे. वापरकर्त्यांना इतर चॅट विंडोंप्रमाणेच त्यांची स्वतःची चॅट विंडो दाखवली जाईल, ज्यामध्ये ते मॅसेज किंवा नोट्स सहजपणे शेअर आणि सेव्ह करू शकतात.

ब्लर टूल फॉर इमेजेस 

अनेक वेळा फोटो पाठवताना त्यातला काही भाग असा असतो, जो तुम्हाला इतरांसोबत शेअर करावासा वाटत नाही. अशा परिस्थितीत इमेजेससाठी नवीन ब्लर टूलची मदत घेता येईल. हे टूल वापरकर्त्यांना फोटो पाठवण्यापूर्वी त्याचा काही भाग ब्लर करण्याचा पर्याय देईल. अशा प्रकारे वैयक्तिक माहिती किंवा फोटोमध्ये दिसणारा कोणताही चेहरा ब्लर होऊ शकतो. हा पर्याय फोटो पाठवण्यापूर्वी एडिटिंग स्क्रीनवर दिसेल.

कॅप्शनसह मीडिया फॉरवर्ड करा

जर तुम्ही WhatsApp वर मीडिया फाईल (फोटो किंवा व्हिडिओ) फॉरवर्ड केली आणि त्यात कॅप्शनमध्ये काहीतरी लिहिलेले असेल, तर फक्त फाइल फॉरवर्ड केली जाते आणि कॅप्शन पुढील संपर्कासह शेअर केले जात नाही. ही समस्या दूर करून, वापरकर्त्यांना लवकरच कॅप्शनसह मीडिया फाइल्स फॉरवर्ड करण्याची संधी दिली जाईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo