IPL Live
क्रिकेटविश्वामध्ये IPL सर्वात मोठा महोत्सव असतो, IPL 2023 आजपासून सुरु होणार आहे. जर तुम्ही IPLचे मोठे फॅन असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. आता तुम्हाला IPL सामने पाहण्यासाठी कोणत्याही OTT ऍपची सदस्यता घ्यावी लागणार नाही. होय, आता तुम्ही तुमची आवडती मॅच घरी बसून मोफत पाहू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.
IPL 2023 चे सामने आता तुम्हाला मोफत पाहता येणार आहे. हे सामने मोफत पाहण्यासाठी Jio Cinema वर लाइव्ह स्ट्रीम करू शकता. या व्यतिरिक्त, जे युजर्स त्यांच्या जिओ रिचार्ज प्लॅनवर जिओ सिनेमाचा अॅक्सेस घेतात, ते सहजपणे याचा लाभ घेऊ शकतात.
या सामन्यांचे प्रसारण देशभरातील 12 भाषांमध्ये केले जाईल. JIO Cinema च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपवर त्यांचा आनंद घेऊ शकता.
JIO चा 296 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे, ज्यामध्ये तुम्हाला 25GB डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS चा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema च्या सबस्क्रिप्शनचा लाभ मिळेल
Jio चा 399 रुपयांचा प्लॅन:
या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांच्या क्रिकेट प्लॅनची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 6GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्ही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता.