VI च्या 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन मोफत, किंमत फक्त 150 रुपये

VI च्या 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन मोफत, किंमत फक्त 150 रुपये
HIGHLIGHTS

VI चा 151 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन एकूण 30 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध

त्याबरोबरच, डिझनी+ हॉटस्टारचे सदस्यत्व 3 महिन्यांसाठी उपलब्ध

देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने काही नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. यामध्ये तुम्हाला डिझनी + हॉटस्टारची मेंबरशिप अगदी कमी खर्चात दिली जाते. आज आम्ही तुम्हाला या यादीतील सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत. Vi चा हा प्लॅन जवळपास 150 रुपयांमध्ये येतो आणि यात तुम्हाला संपूर्ण महिन्याची वैधता मिळेल. प्लॅनमध्ये डिझनी + हॉटस्टार मेंबरशिप देखील देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : Amazon Sale: गेमिंग लॅपटॉपवर मिळतेय तब्बल 35 हजारांची सूट, आजच खरेदी करा…

VI चा 151 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Vodafone Idea चा हा रिचार्ज कंपनीच्या इतर प्लॅनपेक्षा थोडा वेगळा आहे. यामध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधता दिली जाते. सोबत 8 GB डेटा देखील मिळतो. मात्र, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाणार नाही. याशिवाय, यामध्ये डिझनी+ हॉटस्टार सदस्यत्व 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे.

 तसेच, प्लॅनमध्ये कॉलिंग उपलब्ध नाही. जर तुम्हाला कॉलिंग करायचे असेल तर, तुमच्यासाठी कंपनीचा 155 रुपयांच्या प्लॅन आहे. ज्यामध्ये 24 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 1 GB डेटा मिळतो.

Jioचा 149 रुपयांचा प्लॅन

Jio या किंमतीत 149 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. ज्यामध्ये 20 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा दिला जातो. यासोबत तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio ऍप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo