BSNL Offers
भारतातील एकमेव सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक परवडणारे प्लॅन्स उपलब्ध आहेत. नुकतेच, Jio, Airtel आणि VI ने TRAI आदेशानुसार व्हॉइस ओन्ली प्लॅन्स सुरु केले आहेत. मात्र, BSNL ला व्हॉइस आणि SMS ओन्ली प्लॅन्स सुरू करण्याची आवश्यकता नव्हती. याचे कारण म्हणजे BSNL आधीच या श्रेणीतील परवडणारे प्लॅन ऑफर करत आहे.
BSNL कडे दोन मुख्य प्लॅन 99 रुपये आणि 439 रुपयांचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. हे दोन्ही प्लॅन व्हॉइस किंवा व्हॉइस+ SMS कॅटेगरी अंतर्गत येतात. या प्लॅनमध्ये डेटा सुविधांचा समावेश नाही. जाणून घेऊयात या प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्स-
BSNL चा 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये फक्त व्हॉइस कॉलिंग सुविधांची आवश्यकता आहे. या प्लॅनमध्ये 17 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या अंतर्गत तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. त्याबरोबरच, हा प्लॅन विशेषतः एक कॉलिंग व्हाउचर आहे, जो फक्त व्हॉइस कॉलिंग देतो. या प्लॅनमध्ये डेटा किंवा SMS सारखे इतर कोणतेही फायदे समाविष्ट नाहीत. हा प्लॅन भारतातील सर्व भागात उपलब्ध आहे, ज्यामध्ये मुंबई आणि दिल्ली सारख्या मेट्रो सर्कलचा समावेश आहे. जर तुम्ही असे ग्राहक असाल ज्यांना फक्त कॉलिंगची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त असेल.
BSNL चा 439 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा मध्यम मुदतीच्या वैधतेसह येणारा व्हॉइस कॉलिंग आणि SMS प्लॅन आहे. हा ग्राहकांसाठी एक परवडणारा आणि सोयीस्कर ऑप्शन आहे. या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा समाविष्ट आहे. याशिवाय, संपूर्ण वैधतेदरम्यान यात एकूण 300SMS पाठवण्याची सुविधा मिळणार आहे.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
तुम्हाला लक्षात आलेच असेल की, हे प्लॅन्स Airtel, Jio आणि Vodafone Idea सारख्या इतर कंपन्यांच्या मध्यम-मुदतीच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहेत. त्यामुळे हे प्लॅन्स बजेट फ्रेंडली पर्याय बनतात. मात्र, BSNL अद्याप संपूर्ण भारतात VoLTE सेवा प्रदान करत नाही, परंतु 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी वेगाने काम करत आहे.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, आतापर्यंत BSNL ने ‘मेड-इन-इंडिया’ तंत्रज्ञानाचा वापर करून 60,000 हून अधिक 4G साइट्स स्थापित केल्या आहेत. ज्या वापरकर्त्यांकडे BSNL 4G सिम आहे, त्यांच्यासाठी VoLTE सेवा आपोआप सक्रिय होईल.