BSNL Plans
भारतातील एकमेव सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करत असते. जर तुम्हाला कमीत कमी किमतीत भरपूर डेटा आणि कॉलिंग बेनिफिट हवे असतील तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या एका उत्तम पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो वापरकर्त्यांना कमी किमतीत भरपूर डेटा लाभ देतो. डेटा व्यतिरिक्त त्यात इतर अनेक टेलिकॉम फायदे देखील समाविष्ट आहेत.
Also Read: Launched! लेटेस्ट Realme Narzo 80 Pro आणि Narzo 80X भारतात लाँच, पहा किंमत आणि टॉप फीचर्स
जर तुम्ही कमी किमतीत जास्त डेटा असलेला प्लॅन शोधत असाल तर, हा प्लॅन खास तुमच्यासाठी आहे. खरं तर, BSNL चा पोस्टपेड प्लॅन आहे. हा प्लॅन तुम्हाला 399 रुपये किमतीत मिळणार आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL च्या या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 70GB डेटा मिळतो.
एवढेच नाही तर, यात 210GB डेटा रोलओव्हरची देखील सुविधा आहे. हा प्लॅन केवळ डेटाच देत नाही तर वापरकर्त्यांना कॉलिंग सेवा देखील देतो. या प्लॅन अंतर्गत, वापरकर्ते अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही या प्लॅनअंतर्गत दररोज 100 मोफत SMS देखील पाठवू शकता.
BSNL कंपनी त्यांच्या या एका रिचार्ज प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक फायदे देत आहे. तुम्ही बीएसएनएल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ऍपद्वारे हा प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता. प्लॅनमधील उपलब्ध डेटा बेनिफिट्स पाहता, हा प्लॅन घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा कार्यालयीन कामांसाठी खरेदी केला जाऊ शकतो.