एक वर्षाच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा देणारा BSNL प्लॅन, किंमतही कमी

Updated on 05-Dec-2022
HIGHLIGHTS

365 दिवसांच्या वैधतेसह BSNLचा स्वस्त रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे.

तसेच, यामध्ये तुम्हाला कॉलिंग सुविधा देखील मिळणार आहे.

BSNL विविध प्रकारचे स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते, ज्यात ग्राहकांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार एक महिना ते एक वर्ष वैधता असलेल्या प्लॅन्सचा समावेश आहे. तुम्ही BSNL ग्राहक असाल आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, तर हा अहवाल तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या एका खास रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज अधिक डेटा आणि कमी खर्चात अमर्यादित कॉलिंग सारखे अनेक फायदे मिळतात. 

हे सुद्धा वाचा : Digital Rupee म्हणजे काय? बघुयात कोणत्या बँका सुरू करत आहेत 'ही' सुविधा…

BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त 1,515 रुपये आहे. BSNL च्या या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला एका वर्षासाठी 730 GB डेटाचा लाभ मिळत आहे. मात्र, दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर हा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो.

तसेच, यामध्ये कॉलिंग सुविधा देखील मिळते. मात्र, या परवडणाऱ्या योजनेसह OTT चा लाभ आणि SMS ची सुविधा उपलब्ध नाही.

यासोबत, कंपनी 1,499 रुपयांचा आणखी एक प्लॅन ऑफर करते. मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये दररोज 100 SMS आणि 24 GB डेटा उपलब्ध आहे. हा प्लॅन सेकंडरी सिमसाठी वापरला जाऊ शकतो कारण प्लॅन डेटा तसेच अमर्यादित कॉलिंग सुविधेसह येतो.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :