BSNL 2999 Plans
BSNL कडे युजर्ससाठी एकापेक्षा एक कमाल प्लॅन्स आहेत. या लेखात आम्ही तुमच्यासाठी कंपनीचा दीर्घकालीन वैधता असेलला प्लॅन घेऊन आलो आहोत. हा प्लॅन तुम्हाला अप्रतिम बेनिफिट्स देणार आहे. खरं तर, BSNL चा हा प्लॅन 455 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एका वर्षापेक्षा 90 दिवस अतिरिक्त वैधता दिली जात आहे.
BSNL कंपनीच्या या दीर्घकालीन वैधता प्लॅनची किंमत 2,998 रुपये आहे. सरकारी दूरसंचार कंपनी या किमतीत एका वर्षाच्या वैधतेसह तुम्हाला 90 दिवस अतिरिक्त म्हणजे एकूण 455 दिवसांची वैधता प्रदान करेल.
BSNL कंपनी तुम्हाला 2,998 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अप्रतिम बेनिफिट देते. यात तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळेल, ज्यामध्ये तुम्ही लोकल आणि STD कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 1,365GB डेटा दिला जाईल.
डेली 3GB डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा डाउनलोड आणि अपलोड स्पीड 40kbps कमी होईल. इतकेच नाही, तर या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 100 फ्री SMS सुद्धा मिळणार आहेत. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की, हा प्लॅन केवळ जम्मू-काश्मीर क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. लवकरच हा प्लॅन अन्य क्षेत्रात देखील उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी BSNL च्या अधिकृत साईटला भेट द्या.