भारत संचार निगम लिमिटेड BSNL कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक खास मदर्स डे स्पेशल ऑफर आणली आहे. यावर्षी 11 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मदर्स डेच्या आधी, भारतातील सरकारी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी त्यांच्या दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन अंतर्गत अतिरिक्त वैधता देत आहे. जाणून घेऊयात या BSNL प्लॅन्सची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
BSNL India ने त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे मदर्स डे स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने या ऑफर अंतर्गत त्यांच्या दोन विद्यमान प्रीपेड प्लॅनच्या बेनिफिट्समध्ये वाढ केली आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर आजपासून म्हणजेच 7 मे पासून लागू होणार आहे. तसेच, 14 मे पर्यंत ही ऑफर लाईव्ह असेल. ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे.
BSNL ची ही ऑफर 1999 आणि 1499 रुपयांच्या प्लॅनसह सादर केली आहे. हे दोन्ही कंपनीचे दीर्घकालीन वैधता असलेले प्लॅन आहेत. परंतु, मदर्स डेच्या निमित्ताने कंपनी या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना अतिरिक्त वैधता देत आहे. होय, 1999 रुपयांच्या BSNL प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो.
मात्र, मदर्स डेच्या निमित्ताने हा प्लॅन 380 दिवसांची वैधता देत आहे. त्याच वेळी, 149 रुपयांचा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला नवीन ऑफर अंतर्गत 365 दिवसांची वैधता मिळेल.
BSNL च्या 1999 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, जो आता 380 दिवसांची वैधता देईल. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील मिळेल. त्याबरोबरच, इंटरनेट वापरासाठी या प्लॅनमध्ये 600GB डेटा मिळेल. तसेच, यामध्ये 100SMS सारखे बेनिफिट्स आहेत.
BSNL च्या 1499 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो, जो आता 365 दिवसांची वैधता देईल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याबरोबरच, इंटरनेट वापरासाठी 24GB डेटा आणि दररोज 100SMS चे फायदे मिळतात.