केवळ ११८ रुपयात वर्षभरासाठी मिळणार BSNL सेवा

केवळ ११८ रुपयात वर्षभरासाठी मिळणार BSNL सेवा
HIGHLIGHTS

BSNL ने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन प्लान आणला आहे, जो विद्यार्थ्यांच्या गरजांना समोर ठेवून बनवला आहे. केवळ ११८ रुपयात विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी सेवा मिळणार आहे.

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी BSNL ने एक नवीन घोषणा केली आहे. BSNL ने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन प्लान आणला आहे, जो विद्यार्थ्यांच्या गरजांना समोर ठेवून बनवला आहे. केवळ ११८ रुपयात विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी सेवा मिळणार आहे.

ह्या प्लानसाठी विद्यार्थ्यांना वर्षभराचे ११८ रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर जर आपण ११८ रुपयाचे रिचार्ज करता, तर आपल्याला ३० दिवसांसाठी 1GB इंटरनेट डाटा १० रुपयांच्या पुर्ण टॉकटाईमसह ह्यात तुम्हाला स्वस्त व्हॉईस कॉल आणि SMS ची सुविधा मिळेल.

 



जर तुम्हाला हा प्लान घ्यायचा असेल तर, आपल्याला BSNL मुख्य महाव्यवस्थापक सुनील कुमार यांनी असे सांगितले की, “ह्या प्लानला ९० दिवसांसाठी २० जूनपासून सुरु केले जाईल. त्याचबरोबर ह्या प्लानला आपल्याला जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्रातून घ्यावा लागेल.”

 

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

BSNL ने काही दिवसांपूर्वी अशी माहिती दिली होती की, देशात जवळपास ४०,००० वायफाय हॉटस्पॉट लावणार आहे. तर काही इतर मिडिया हाउस हा आकडा २०,००० पर्यंतचा असल्याचे सांगत आहेत. इकॉनॉमिक्स टाइम्सने BSNL चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अनुपम श्रीवास्तव यांनी असे सांगितले आहे की. BSNL हे काम पुढील २ वर्षात करणार आहे.

 

हेदेखील वाचा – मोटो G4 स्मार्टफोन झाला भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ,१२,४९९ रुपये
हेदेखील वाचा – 
स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo