BSNL BiTV: भारतातील एकमेव सरकारी मालकीची आघाडीची टेलिकॉम कंपनी म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने त्यांच्या वापरकर्त्यांना एक गुड न्यूज दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, BSNL ने BiTV नावाची एक डायरेक्ट-टू-मोबाइल टीव्ही सर्व्हिस सुरू केली आहे. याद्वारे वापरकर्त्यांना 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलची सुविधा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, OTT Play च्या भागीदारीत सरकारी टेलिकॉम कंपनी आता त्यांच्या युजर्सना त्यांची ही सेवा पूर्णपणे मोफत देत आहे.
Also Read: Good News! रिलायन्स Jio चा लोकप्रिय प्लॅन झाला स्वस्त, जबरदस्त बेनिफिट्ससह OTT सबस्क्रिप्शन Free
एकमेव दूरसंचार कंपनी BSNL ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हँडलवर पुष्टी केली आहे की, त्यांच्या फक्त 99 रुपयांच्या सर्वात परवडणाऱ्या व्हॉइस-ओन्ली प्लॅनवर वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय BiTV चा आनंद घेऊ शकतात. याचा अर्थ असा की, आता तुमच्या स्मार्टफोनवर लाईव्ह टीव्ही पाहणे आणखी सोपे आणि स्वस्त झाले आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, BiTV ही BSNL ची डायरेक्ट-टू-मोबाइल सर्व्हिस आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल, वेब सिरीज आणि चित्रपटांचा आनंद घेता येईल. लक्षात घ्या की, टेस्टिंग फेजमध्ये कंपनीने 300 हून अधिक मोफत टीव्ही चॅनेलची सुविधा प्रदान केली जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता ही सेवा सर्व BSNL सिम कार्डसह पूर्णपणे एकत्रित करण्यात आली आहे.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
BSNL च्या 99 रुपयांचा व्हॉइस ओन्ली प्लॅनमध्ये 17 दिवसांची सेवा वैधता मिळेल. या प्लॅनअंतर्गत तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. हा प्लॅन विशेषतः एक कॉलिंग व्हाउचर आहे, जो फक्त व्हॉइस कॉलिंग देतो. त्याचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे हा पालन भारतातील सर्व भागात उपलब्ध आहे. ज्यामध्ये मुंबई आणि दिल्ली सारख्या मेट्रो सर्कलचा समावेश आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि SMS सारखे बेनिफिट्स उपलब्ध नाहीत.