BSNL Plan: दीर्घकाळ वैधतेसह मिळेल तब्बल 252GB डेटा
भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL कडे अनेक अप्रतिम प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी इतर खाजगी दूरसंचार कंपन्यांपेक्षा कमी किमतीत उत्तम बेनिफिट्ससह प्लॅन्स उपलब्ध करून देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी दीर्घ वैधतेसह कमी किमतीत एक अप्रतिम प्लॅन ऑफर करते. या प्लॅनसह तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात BSNL प्लॅनची किंमत आणि सर्व अप्रतिम बेनिफिट्स-
BSNL च्या कथित प्लॅनची किंमत 599 रुपये इतकी आहे. BSNL चा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, हा एक प्रीपेड प्लॅन आहे. जो वर सांगितल्याप्रमाणे, 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना 3GB डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 252GB डेटाचा लाभ मिळेल. त्याबरोबरच, या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. तसेच, यात दररोज 100SMS देखील मिळणार आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, यूजर्स हा प्लॅन BSNL सेल्फकेअर ॲपच्या मदतीने रिचार्ज करू शकतात. लक्षात घ्या की, जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. एकदा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही बीएसएनएल मोबाइल नंबरच्या मदतीने लॉग इन करून हा प्लॅन रिचार्ज करू शकता. तसेच, BSNL च्या अधिकृत वेबसाईट वरून देखील हा प्लॅन खरेदी करता येईल. किंवा रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा!
BSNL च्या युजर्ससाठी 797 रुपयांचा पॉवर प्लॅन सुद्धा आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना तब्बल 300 दिवसांची वैधता ऑफर करते. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनच्या पहिल्या 60 दिवसांसाठी तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा, दररोज 2GB डेटा आणि 60 दिवसांसाठी प्लॅनमध्ये मोफत SMS ची सुविधाही दिली जाते. त्यानंतर, केवळ इनकमिंग व्हॉईस कॉलिंगची सुविधा 300 दिवस सुरू राहील. हा प्लॅन केवळ सिम ऍक्टिव्ह ते इच्छिणाऱ्या युजर्ससाठी उपयुक्त आहे.