BSNL चा जबरदस्त ब्रॉडबँड: दरमहा 4TB डेटा, Disney+ Hotstar Premium मोफत; बिलवर तब्ब्ल 90% पर्यंत सूट

BSNL चा जबरदस्त ब्रॉडबँड: दरमहा 4TB डेटा, Disney+ Hotstar Premium मोफत; बिलवर तब्ब्ल 90% पर्यंत सूट
HIGHLIGHTS

BSNL चा जबरदस्त ब्रॉडबँड प्लॅन

या ब्रॉडबँड प्लॅनची किंमत एकूण 1,499 रुपये

या प्लॅनसह Disney + Hotstar Premium बेनिफिट वर्षभरासाठी मोफत

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) हे देशातील सर्वात लोकप्रिय इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स (ISPs) पैकी एक आहे. कंपनीकडे अशा अनेक उत्तम ब्रॉडबँड प्लॅन्स आहेत, जे खाजगी कंपन्यांच्या प्लॅन्सपेक्षा जास्त बेनिफिटसह येतात. जर तुम्ही हेवी इंटरनेट युजर असाल आणि फास्ट स्पीड अधिक डेटासह प्लॅन शोधत असाल, तर BSNL कडे तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे. ज्यामध्ये डिझनी + हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. चला तर जाणून घेऊयात या खास प्लॅनबद्दल… 

हे सुद्धा वाचा : LG स्मार्ट TVवर पहिल्यांदाच एवढी जोरदार ऑफर! 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

BSNL ब्रॉडबँड प्लॅन 

आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत त्याची किंमत एकूण 1,499 रुपये आहे (सध्या यात  कर समाविष्ट नाही). या प्लॅनमध्ये यूजर्सना 300 Mbps स्पीड मिळेल. यासोबतच यूजर्सना दर महिन्याला 4TB पर्यंत FUP डेटा देखील मिळतो. हे तुम्हाला खाजगी कंपन्यांकडून मिळणाऱ्या डेटापेक्षा खूप जास्त आहे.

याशिवाय, युजरला प्लॅनमध्ये Disney + Hotstar Premium चा लाभ देखील मिळतो.  Disney + Hotstar Premium ची खरी किंमत 1,499 रुपये प्रति वर्ष आहे. परंतु येथे, प्लॅनसह तुम्हाला त्याचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळेल.

इतकेच नाही तर कॉल करण्यासाठी यूजरला प्लॅनमध्ये फ्री फिक्स्ड लाइन कनेक्शन देखील मिळेल. परंतु टेलिफोन इक्विपमेंट ग्राहकालाच खरेदी करावे लागतील. कंपनी ग्राहकांना पहिल्या महिन्याच्या बिलवर 500 रुपयांपर्यंत 90% सूट देते.

BSNL चे इतर 300Mbps प्लॅन

BSNL इतर 300Mbps प्लॅन देखील ऑफर करते. मात्र, या योजना कोणतेही OTT फायदे देत नाहीत आणि त्यांची मासिक किंमत देखील जास्त आहे. त्यांच्या उच्च किंमतीचे कारण ते अधिक FUP डेटा देतात. 2,499 आणि 4,499 रुपयांच्या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 5TB आणि 6.5TB मासिक डेटा मिळतो. या योजना मोठ्या संस्था किंवा ग्रंथालयांसाठी योग्य आहेत जिथे बरेच लोक दररोज इंटरनेटशी कनेक्ट होतात. या महागड्या प्लॅनमध्येही FUP डेटा वापरल्यानंतर चांगला इंटरनेट स्पीड मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo