LG स्मार्ट TVवर पहिल्यांदाच एवढी जोरदार ऑफर! 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

LG स्मार्ट TVवर पहिल्यांदाच एवढी जोरदार ऑफर! 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

LG स्मार्ट TVवर मिळतेय भारी सूट

ऑफर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध

25% सूटमध्ये तुम्हाला हा टीव्ही 16,490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल

जर तुम्ही ब्रँडेड स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि मोठ्या डिस्काउंट ऑफरची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, फ्लिपकार्ट सेलमध्ये, LG चा 32-इंच लांबीचा Android TV सुमारे 12 ते 13 हजार रुपयांनी स्वस्त किमतीत विकला जात आहे. फ्लिपकार्टवर या टीव्हीची किंमत 21,990 रुपये आहे. 25% सूटमध्ये तुम्हाला हा टीव्ही 16,490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात  फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या या डीलबद्दल… 

हे सुद्धा वाचा : Jio-Airtel-Vi: केवळ 5 रुपये दररोजमध्ये, सर्वात स्वस्त 365 दिवसांच्या वैधतेसह सर्वोत्तम रिचार्ज

LG च्या 32-इंच टीव्हीवर उपलब्ध डील 

LG 32 इंच HD रेडी LED स्मार्ट टीव्ही (32LM565BPTA) वर विविध बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध आहेत. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, टीव्ही खरेदी करताना SBI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते. दुसरीकडे, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 500 रुपयांची सूट मिळेल. 

यासोबतच तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला हा टीव्ही अतिशय स्वस्तात मिळेल. तुमच्याकडे जुना टीव्ही चांगल्या स्थितीत असल्यास, तुम्हाला 8,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. या सर्व सवलतींनंतर तुम्ही रु.8000 पेक्षा कमी किमतीत टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हीसाठी कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. यासोबतच तुम्हाला 1,833 रुपयांच्या नो-कॉस्ट-EMIवरही टीव्ही खरेदी करता येईल. येथून खरेदी करा… 

LG 32 इंच TV ची वैशिष्ट्ये

LG स्मार्ट TV 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. हे उपकरण 10W साउंड आउटपुट देते. याचा रिफ्रेश रेट  50Hz आहे. हा टीव्ही Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि Youtube ला सपोर्ट करतो. यामध्ये WebOS ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo