Jio चे 3 सर्वात Powerful प्लॅन्स! दररोज 3GB डेटासह मिळेल मोफत Netflix-Hotstar चे सबस्क्रिप्शन

Updated on 08-Apr-2025
HIGHLIGHTS

दररोज 3GB डेटासह येणारे Jio चे जबरदस्त प्लॅन्स

या प्लॅनमध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये Netflix सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन डेटा प्रदान केला जातो. जे युजर्स ऑनलाईन क्लासेस किंवा कार्यालयीन काम करतात, त्यांना अधिक डेटाची आवश्यकता असते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या 3GB डेटाबद्दल माहिती देणार आहोत.

एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये मनोरंजनासाठी OTT ऍप्ससह प्रीमियम अप्लिकेशन्सचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. यादी पुढीलप्रमाणे-

Jio चा 449 रुपयांचा प्लॅन

Jio या रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी तुम्हाला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100SMS उपलब्ध आहेत. इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग सुविधा दिली जात आहे. यासह, युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, 50GB क्लाउड स्टोरेज देखील उपलब्ध आहे. या पॅकमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळणार आहे.

Best Reliance Jio Plans

Jio चा 1,119 रुपयांचा प्लॅन

टेलिकॉम कंपनी Jio च्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा आणि 100SMS ची सुविधा देते. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. एवढेच नाही तर, प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजाची देखील सोय करण्यात आली आहे. जिओ हॉटस्टारसह प्रीमियम ऍप्सचा मोफत ऍक्सेस आणि 50GB AI क्लाउड स्टोरेज देण्यात येत आहे. या प्लॅनची वैधता तब्बल 84 दिवसांपर्यंत आहे.

Jio चा 1799 रुपयांचा प्लॅन

Jio चा 1799 रुपयांचा प्लॅन हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय प्रीपेड प्लॅन आहे. बेनिफिट्सबदलद बोलायचे झाल्यास, या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS सर्व्हिसची सुविधा मिळते. या पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. याद्वारे वापरकर्ते इतर नेटवर्कवर तासनतास बोलू शकतात.

याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये Netflix सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. याशिवाय, प्रीपेड पॅकमध्ये 90 दिवसांसाठी JioHotstar चा ऍक्सेस दिला जात आहे. यामध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे 50GB क्लाउड स्टोरेज उपलब्ध आहे. या प्रीपेड पॅकची वैधता संपूर्ण तीन महिने म्हणजेच 90 दिवसांची आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :