Airtel Recharge Plans 2025
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती Airtel आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड ग्राहकांसाठी वेगवेगळ्या गरजांनुसार विविध प्लॅन्स ऑफर करते. मात्र, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला एका महिन्याच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, 28 दिवसांच्या वैधतेसह हे प्लॅन्स खूप लोकप्रिय झाले आहेत. हे प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी लाभदायी आहेत, ज्यांना दरमहा एका निश्चित बजेटमध्ये टेलिकॉम सुविधांचा लाभ घ्यायचा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Airtel च्या 28 दिवसांच्या प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. किंमत असेल 500 रुपयांपेक्षा कमी-
Airtel 199 रुपयांचा प्लॅन: हा 199 रुपयांचा प्लॅन Airtel चा सर्वात बेसिक रिचार्ज आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या टॅरिफमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100SMS, 2GB डेटा लाभ मिळतील. यासह विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन आणि हॅलोट्यून्सचा मोफत ऍक्सेस देखील मिळेल.
Airtel 299 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS देतो. यात मोफत म्युझिक सबस्क्रिप्शन, Fastag वर कॅशबॅक आणि Apollo 24/7 सर्कल ऍक्सेस असे इतर फायदे देखील समाविष्ट आहेत.
Airtel 301 रुपयांचा प्लॅन: हा एअरटेल प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. इंटरनेट वापरासाठी यात दररोज 1GB डेटा मिळतो. तसेच, यामध्ये तीन महिन्यांसाठी मोफत JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS असे लाभ मिळतील.
Airtel 349 रुपयांचा प्लॅन: हा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB डेटा देतो. याव्यतिरिक्त, यात अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100SMS, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक आणि विंक म्युझिकचा ऍक्सेस देखील मिळतो.
Airtel 398 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, मोफत अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS देखील मिळतात. तसेच, यात JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये देखील इतर प्लॅन्सप्रमाणे महिन्याभराची वैधता आहे.
Airtel 409 रुपयांचा प्लॅन: हा 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2.5GB डेटा देतो. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100SMS, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक आणि Wynk म्युझिक ऍक्सेस देखील मिळतो.
Airtel 449 रुपयांचा प्लॅन: कंपनीचा हा प्लॅन या यादीतील सर्वात महाग प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस कॉल, 100SMS मिळणार आहेत. तसेच, यात विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम मोबाइल ऍप सारख्या स्ट्रीमिंग सर्व्हिसेसचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.