मोबाईल निर्माता कंपनी यू चा लवकरच लाँच होणारा स्मार्टफोन यूटोपिया मेटल बॉडीने सुसज्ज असेल. खरे पाहता कंपनीने स्वत: ह्याबाबत माहिती दिलीय, त्याचबरोबर हल्लीच कंपनीने ह्या फोनसाठी आपल्या वेबसाईटवर नोंदणीसुद्धा सुरु केली आहे. यू द्वारा ट्विटच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, यू ब्रँडचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन यूटोपिया मेटल बॉडीने बनलेला असेल.
ह्या स्मार्टफोनची किंमत १०,००० पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि हा फ्लॅश सेलच्या माध्यमातून उपलब्ध न होणारा यू ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल. आतापर्यंत ह्या कंपनीचे सर्व स्मार्टफोन्स हे फ्लॅश सेलद्वारा मिळत होते.
जर यू यूटोपिया स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.२ इंचाची डिस्प्ले असेल. त्याचबरोबर ह्यात स्नॅपड्रॅगन ८१० चिपसेट आणि ४जीबीची रॅम असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन ३२ जीबीच्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असेल.
त्याशिवाय, ह्या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल असा अंदाज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्ट, ब्लूटुथ, वाय-फाय आणि GPS असू शकतो.
बाजारात ह्या स्मार्टफोनला प्रतिस्पर्धी म्हणून मेटल बॉडी असलेले श्याओमी Mi 4 आणि वनप्लस २ सुद्धा उपलब्ध आहे.