३१ मार्चला भारतात लाँच होईल शाओमी Mi 5 स्मार्टफोन

Updated on 28-Mar-2016
HIGHLIGHTS

शाओमी आपला नवीन स्मार्टफोन शाओमी Mi 5 ३१ मार्चला भारतात लाँच करेल. ह्या स्मार्टफोनची किंमत साधारण २७,००० रुपये असेल.

शाओमीच्या अधिकृत लाँच कार्यक्रमात (भारतात लाँच होण्याआधी) ह्यूगो बाराने सांगितले होते की, ह्या स्मार्टफोनला भारतात पुढील महिन्यात लाँच केले जाईल. मात्र ह्याच्या लाँच डेटबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे. ह्या स्मार्टफोनला भारतात 31 मार्चला लाँच केले जाईल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनची किंमत भारतात २०,००० रुपये ते २७,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. शाओमीने ह्या स्मार्टफोनच्या लाँचसाठी निमंत्रण पाठवणे सुरु केले आहे.

 

चीनमध्ये ह्या स्मार्टफोनला 32GB आणि 64GB अशा प्रकारात लाँच केले गेले होते. त्याचबरोबर ह्यात 3D ग्लास बॅकसह लाँच केले गेले होते. ह्याचा एक 128GB चा प्रकारसुद्धा लाँच केला गेला होता, जो एक 3D सेरामिक बॉडीने सुसज्ज होता.

त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनची लाँच डेट येण्याआधीच एक प्रेझेंटेशन स्लाइड समोर आली होती आणि फोनचे स्पेक्ससुद्धा ह्या स्लाइडच्या माध्यमातून समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शाओमी Mi 5 मध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर असेल. रॅम आणि स्टोरेजच्या आधारावर हे दोन प्रकारात असतील, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज. लीक झालेल्या प्रेजेंटेशन स्लाइडमध्ये हँडसेटमध्ये USB टाइप-C पोर्ट, क्विक चार्ज 3.0 सपोर्ट आणि २६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर ह्यात 3600mAh ची बॅटरी आहे आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असेल, असं दिसतय.

 

tttt

Here's the first video teaser for #Mi5. Just how fast is fast? Record holder Xiao Lin Cen, who can skip rope 1096 times (1096!!!) in 3 minutes shows you how. Forget everything you know about speed, #Mi5 will show you the meaning of fast in just 7 days now.I'm pretty handy with a jump rope myself…do you guys wanna see me try this? Leave a comment if you think I should do the #SkipChallenge too.

Posted by Hugo Barra on Wednesday, 17 February 2016

 

 

pppp

शाओमीने Mi 5 चे एक टीजर व्हिडियो फेसबुकवर जारी केले आहे. ज्यात ‘खूप जास्त तेज’ असे म्हटले आहे. शाओमाचे उपाध्यक्ष ह्यूगो बाराने फेसबुकवर Mi 5 स्मार्टफोनचा पहिला व्हिडियो टीझर जारी केला आहे. हा ‘इनसेनली फास्ट अँड मोर’ च्या टॅगलाइसह संपतो. कंपनीने ह्याआधीच सांगितले आहे की, हा स्मार्टफोन ड्यूल-सिम फीचर आणि NFC कनेक्टिव्हिटीसह येईल.

 

शाओमी Mi 5 स्मार्टफोनला चीनच्या एक थर्ड पार्टी ऑनलाइन रिटेलर गियरबेस्टने आपल्या साइटवर लिस्ट केला होता. गियरबेस्टच्या लिस्टिंगनुसार, शाओमी Mi 5 स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची QHD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे.

 

ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 3600mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा आहे. हा 4G LTE ला सुद्धा सपोर्ट करतो. हा अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर आधारित MiUi 7 ROM आणि ड्यूल सिम सपोर्टसह येतो.

 

हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर सुरु झालाय मेगा मोबाईल सेल

हेदेखील वाचा – ६ एप्रिलला लाँच होऊ शकतो मिजू M3 नोट स्मार्टफोन

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :