Xiaomi च्या दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काउंट
'Redmi 10 Prime 2022' स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी
जाणून घ्या फोनवरील अतिरिक्त सूट...
धमाकेदार दिवाळी सेल Xiaomi च्या वेबसाइटवर लाईव्ह आहे. या सेलमध्ये तुम्ही बंपर ऑफर्स आणि डिस्काउंटसह कंपनीची अनेक प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. जर तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये तुमच्यासाठी एक जोरदार ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही रु. 14,999 किंमतीचा 'Redmi 10 Prime 2022' स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची MRP 14,999 रुपये आहे. सवलतीसह, हे Xiaomi च्या वेबसाइटवर 9,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. फोनवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळविण्यासाठी, तुम्हाला CITI बँक कार्डद्वारे पैसे भरावे लागतील.
फोनमध्ये कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच फुल HD + डॉट डिस्प्ले देत आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येत असलेल्या या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 90Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 4 GB LPDDR4X रॅम आणि 64 GB eMMC स्टोरेज मिळेल. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून तुम्हाला MediaTek Helio G88 चिपसेट पाहायला मिळेल.
फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे यात 9W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील आहे. फोनच्या रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला 22.5 W चा चार्जर मिळेल. हा फोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi, Bluetooth 5.1 आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. जोपर्यंत सेल्फीचा प्रश्न आहे, हा फोन 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह येतो.
Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.