प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने Xiaomi 15 गेल्या महिन्यात मार्चमध्ये भारतात लाँच केला होता. त्यानंतर, आज या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा पहिली सेल दुपारी 12 वाजतापासून प्रसिद्ध शॉपिंग साईट Flipkart वर सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये या फोनवर तुम्हाला भारी बँक ऑफर्स आणि EMI पर्याय मिळणार आहे. हा फोन कंपनीने जरा महागड्या बजेट श्रेणीत लाँच करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Xiaomi 15 ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Samsung Smart TV Sale: निम्म्या किमतीत खरेदी करा मोठे स्मार्ट टीव्ही, पहा सर्वात आकर्षक डील्स
Xiaomi कंपनीने Xiaomi 15 ची किंमत 64,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास तब्बल 5000 रुपयांची थेट सूट दिली जात आहे. तसेच, या मोबाईल फोनवर 3,151 रुपयांचा EMI दिला जात आहे. त्याबरोबरच, या फोनवर 32,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
Xiaomi 15 स्मार्टफोनमध्ये 6.36 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी, स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमची स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिप देण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून प्रतिकारासाठी IP68 रेटिंग मिळाले आहे.
Xiaomi 15 हा नवीन अँड्रॉइड 15 वर कार्य करतो. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी 50MP प्रायमरी, 50MP टेलिफोटो आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5240mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 50W वायरलेस आणि 90W वायर फास्ट चार्जिंग सुविधेसह येते. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम कार्ड स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे.