त्वरा करा ! Xiaomi च्या 108MP कॅमेरा असलेल्या 5G फोनवर मिळतेय 6,500 रुपयांपर्यंत सूट

Updated on 16-Aug-2022
HIGHLIGHTS

Xiaomi 11i 5G वापर डिस्काउंटसह खरेदी करा

5G फोनवर मिळतेय 6,500 रुपयांपर्यंत सूट

फोन कंपनीच्या साइटवर 26,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध

Xiaomi चा 108MP कॅमेरा असलेला Xiaomi 11i 5G फोन बंपर सवलतीसह तुमचा असू शकतो. फोनचा 8 GB  रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज फोन कंपनीच्या साइटवर 26,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. फोन खरेदी करताना तुम्ही CITI बँक किंवा बँक ऑफ बडोदा कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

 याशिवाय, कंपनी सर्व बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 5000 रुपयांची अतिरिक्त झटपट सूट देखील देत आहे. दरम्यान, जर तुम्ही हा फोन Mi एक्सचेंजमध्ये खरेदी केला तर तुम्हाला 16,500 रुपयांपर्यंतचा अधिक लाभ मिळू शकतो. यासोबतच, तुम्हाला 5 हजार रुपयांचा वेगळा एक्सचेंज बोनसही मिळेल.

हे सुद्धा वाचा : Samsung च्या फोल्डेबल फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरू, 40,000 रुपयांपर्यंत गिफ्ट्स मिळवण्याची संधी

Xiaomi 11i 5G

Xiaomi 11i 5G कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67 इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये दिलेल्या या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1200 nits आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देण्यात आला आहे. फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Dimension 920 5G देण्यात आला आहे.

यामध्ये, 5160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67 W Xiaomi टर्बो चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.2 सारखे पर्याय देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, हा फोन MIUI 12.5 वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :