6GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह Vivo Y53t 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

6GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह Vivo Y53t 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

Vivo Y53t 5G अखेर बाजारात लाँच

या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 11,980 रुपये

या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo ने आपल्या Y-सिरीज अंतर्गत चीनमध्ये Vivo Y53t 5G हा नवीन फोन सादर केला आहे. हा बजेट स्मार्टफोन Vivo Y52t चा सक्सेसर म्हणून आला आहे. या फोनमध्ये 6.51-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आणि Mediatek Dimensity 700 SoC प्रोसेसर आहे. 6GB RAM सह येणारा हा फोन Android 13 वर आधारित OriginOS Ocean वर काम करतो. 

हे सुद्धा वाचा : Vodafone Idea चे 25 आणि 55 रुपयांचे प्लॅन्स, डेटासह मिळेल ऍड-फ्री म्युझिकचा लाभ

Vivo Y53t 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y53t 5G मध्ये 6.51-इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे. त्यात MediaTek Dimensity 700 7nm प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजसाठी, यात LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेज आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर ते Android 13 वर आधारित OriginOS Ocean UI वर काम करते.

 या फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. तसेच, समोर 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल सिम, 5G, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GNSS आणि USB टाइप-C सपोर्ट आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याव्यतिरिक्त, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo Y53t 5G किंमत आणि उपलब्धता

Vivo Y53t 5G चा 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट चीनमध्ये CNY 999 म्हणजेच 11,980 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तर 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 1099 आहे. हा फोन ऑरेंज फ्रूट आणि ब्लॅक ट्रफल कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y53t 5G चीनमध्ये 9 जानेवारी 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo